Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भोसरी मतदारसंघ विकासापासून दूरच; व्हिजन २०२० चे गाजरही दिवाळखोरीत” – अजित गव्हाणे

April 6, 2022
in घडलं-बिघडलं
0
Ajit Agvhane And Mahesh Landge

मुक्तपीठ टीम

भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केल्याचा दावा आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पक्षाकडून केला जात असला तरी या दाव्याची पोलखोल नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या रेडीरेकनरच्या दरामुळे झाली आहे. विकासाच्या नावाखाली केवळ गाजरे दाखविण्याचे काम करणाऱ्या आमदारांच्या मनमानी आणि निष्क्रीय कारभारामुळे भोसरीचा विकास म्हणजे पाण्यावरचे बुडबुडेच ठरल्याचा सणसणाटी आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.

 

राज्य शासनाने नुकतेच रेडीरेकनरचे दर जाहीर केले आहेत. ज्या भागात सर्वाधिक विकास होतो त्या भागामध्ये रेडीरेकनरचा दर हा अधिक असतो. रस्ते, पाणी, वीज यासोबतच दळणवळणाची साधने व राहण्यायोग्य वातावरण असलेल्या भागाचा सर्वाधिक विकास होतो. पिंपरी-चिंचवड शहरातील रेडीरेकनरचे दर जाहीर झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत शहरात किती असमान विकास झाला हे देखील समोर आले आहे. याबाबत अजित गव्हाणे यांनी सडकून टीका केली आहे.

 

अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपाचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे हे महापालिकेचे कारभारी आहेत. भोसरीतील मतदारांनी अत्यंत विश्वासाने त्यांना दोनवेळा विधानसभेत पाठविले, मात्र त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना केवळ विकासाची स्वप्ने दाखविली. मोठा गाजावाजा केलेल्या व्हिजन २०२० हे केवळ गाजरच ठरले असून आता हे गाजरदेखील दिवाळखोरीतच निघाल्याचे रेडीरेकनच्या दरावरून स्पष्ट झाले आहे.

 

रेडीरेकनच्या दराचा विचार करावयाचा झाल्यास वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या परिसरातील निवासी इमारतींचा दर ४,९०० ते ९,२०० रुपये प्रति चौरस फुट आहे. तर मोशी, तळवडे, चिखलीचा विचार केल्यास हाच दर ३,९०० ते ६,००० हजार रुपये प्रति चौरस फुट आहे. यावरूनच भोसरी विधानसभेचा विकास किती मागासलेला आहे हेच सिद्ध होत आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहराचा विचार करता राष्ट्रवादीने महापालिकेत सत्ता असताना शहराचा समान विकास करण्यावर भर दिला होता. मात्र महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपच्या कारभाऱ्यांनी सर्वाधिक दुर्लक्ष हे भोसरी विधानसभेतील विविध गावांकडे केले. त्यामुळे भोसरी, चऱ्होली, तळवडे, चिखली, मोशी ही गावे विकासापासून दूरच राहिल्याचे रेडीरेकनरच्या दरावरून स्पष्ट होत आहे. सर्वात कमी दर हा भोसरी विधानसभेतील सर्वच भागांचा असावा हे भाजपवर विश्वास दाखविणाऱ्या नागरिकांचे दुर्देवच म्हणावे लागेल.

 

प्राधिकरणाने विकसीत केलेला इंद्रायणीनगरचा परिसर वगळता गेल्या पाच वर्षांत या परिसरात सत्तेच्या आडून भाजपच्या नेत्यांनी निर्माण करण्यात आलेल्या दहशतीमुळे विकासकामे अपेक्षित वेगाने झाली नाहीत. कोणत्याही नामांकित इंडस्ट्रीची नव्याने पायाभरणी झाली नाही. एकही नवा व्यवसाय नावारुपाला आलेला नाही. सत्तेच्या आडून निर्माण करण्यात आलेल्या दहशतीमुळे भोसरी विधानसभेतील अनेक गावे आजही विकासापासून वंचित राहिलेली असून याला आमदार हेच जबाबदार असल्याचेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.

 

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये व्हिजन २०२० चे स्वप्न नागरिकांना दाखविले होते. मात्र त्या व्हिजनचे काय झाले हे बोलण्याची धमक आमदारांमध्ये राहिलेली नाही. रोज नविन गाजरे दाखवायची आणि त्यातून स्वत:चा स्वार्थ साधायचा हा एकमेव उपक्रम या महाशयांकडून सुरू आहे. भोसरीला विकासापासून दूर ठेवण्याचे पाप करणाऱ्या भाजपला आणि आमदारांना भोसरीतील जनता कदापी माफ करणार नसून येत्या महापालिका निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.


Tags: Ajit GawhaneBhosariMahesh Landgeपिंपरी-चिंचवड शहरभोसरीमहेश लांडगेराष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे
Previous Post

नाभिक समाजासाठी अभ्यासगट नेमणार – धनंजय मुंडे

Next Post

रिझर्व्ह बँकेचा तीन सहकारी बँकांना दंड, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम…

Next Post
RBI

रिझर्व्ह बँकेचा तीन सहकारी बँकांना दंड, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!