Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

#चांगलीबातमी जगात प्रथमच किल्यावर पालिकेची विशेष सभा

अजिंक्यताऱ्याने अनुभवला 'शाही स्वाभिमान दिवस'

January 18, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Ajinkyatara Satara function

    • सातारा भूषण पुरस्काराने अजय जाधवराव, राजूशेठ राजपुरोहित यांचा सन्मान
    • सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात, तुतारींच्या निनादात भगव्या वातावरणात उत्सवाची वाढली शान

     

    महेश पवार

    सातारा  – झेंडूच्या फुलांनी सजवलेला किल्ले अजिंक्यतारा, राजसदरेवर काढलेल्या रांगोळय़ा, सनईचा मंजूळ स्वर, तुताऱ्यांचा निनाद, अशा शिवमय वातावरणात किल्ले अजिंक्याताऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहु महाराज यांचा राज्याभिषेक व सातारा शहराचा स्थापना दिन तथा 11 वा सातारा स्वाभिमान दिवस शाही पद्धतीने उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात किल्ल्यावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा देशात पहिला मान साताऱ्याला मिळाला. या सभेत अजिंक्यताऱ्याच्या विकासाचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. छत्रपती शाहु महाराजांच्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करणारे अजय जाधवराव, राजुशेठ राजपुरोहित यांचा सवयभान चळवळीचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते सातारा भूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

     

    शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने किल्ले अजिंक्यताऱ्यावर सातारा स्थापना दिन व सातारा स्वाभिमान दिन उत्साहात शाही पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, सुजाता राजेशिर्के, स्मिता घोडके, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, ऍड. दत्ता बनकर, शेखर मोरे-पाटील, निशांत पाटील, बाळासाहेब ढेकणे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, संस्थापक अध्यक्ष सुदामदादा गायकवाड, कन्हैय्यालाल राजपुरोहित, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, मनसेचे सातारा शहरप्रमुख राहुल पवार, भाजपाच्या दीपा झाड, दीपक भुजबळ, शिवभक्त अभि सुर्वे, मंगेश काशिद, सातारा सायकल ग्रुपचे संतोष शेडगे, डॉ. दीपक थोरात व सदस्य उपस्थित होते.

    अजय जाधवराव म्हणाले, मातृसंस्था असलेल्या सातारा पालिकेची सभा होण्याचा मान भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अजिंक्यतारा गडाला मिळतोय. याला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण या किल्ल्याला आमच्यासाठी काशी विश्वेश्वराइतकच महत्व आहे. या किल्यावर महाराजसाहेब शहाजीराजे यांच्यापासून ते शाहु महाराजांपर्यंत प्रत्येक छत्रपती परंपरेचे पदस्पर्श लागलेले आहेत. तथापि अजिंक्यताऱ्याचे महत्व वाढवलं ते छत्रपती शाहू महाराजांनी. त्यांनी सातारा शहराची निर्मिती केली. शहराला ग्रामदैवत नाही कारण सातारा हे खेडं नव्हतं. साताऱ्याचे देणं आहे. त्याच छत्रपती शाहू महाराजांची समाधी माहुलीला आहे. तिच्या जीर्णोद्धाराचा पहिला नारळ याच कार्यक्रमात तीन वर्षापूर्वी फुटला. राजू शेठ भारावले अन् त्या समाधीचा मुहूर्त रचला. नदी पत्रात समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे त्यांनी सांगत सातारा पालिकेच्या नव्या वास्तूत छत्रपती शाहु महाराजांचे स्मारक असावे अशी भावना व्यक्त केली.

    डॉ. संदीप मंहिद गुरुजी म्हणाले, मी सात वर्षापासून येतो आहे, ज्या भूमीत आपण वाढलो अशा सातारा नगरीचा या उत्सवात प्रत्येकाने आले पाहिजे. म्हणून गेल्या दहा वर्षांपासून येतोय ध्यासात कमी झालं नाही. 1674 चा शिवछत्रपतींचा राज्यभिषेक झाला. स्वतंत्र म्हणजे काय हे अनुभवले. तो सोहळा रायगडावर पार पडला, तिस्रया छत्रपतीचा राज्यभिषेक याच किल्यावर पार पडला. त्याच किल्ल्यावर आपण स्वाभिमान दिवस साजरा करत आहोत आपण भाग्यवान आहोत. खरे तर सगळे योग असतात, या आपल्या पालक संस्थेच्या माध्यमातून दुर्गावर कुठेही सर्वसाधारण सभा होत नाही.या सातारा नगरपालिकेची सभा होतेय याचा अभिमान आहे.

    दीपक प्रभावळकर म्हणाले, आधी बारा वर्षे गडावर काम केलं आणि मग प्रत्यक्ष उत्सवाला सुरुवात केली. अशी बावीस वर्ष या स्वाभिमान दिनामागे इतिहास आहे. यंदा बातमी नाही पोस्ट नाही बॅनर नाही, स्वाभिमान दिनाचा उत्सव होत आहे. योगायोगाने हद्दवाढ झाली अन ज्या अजिंक्यताऱ्याहने दिल्ली राखली, अटक राखली तेथेच सभा पालिकेने घेतली. किल्यावर सभा घेणारी नगरपालिका प्रथमच आहे. छत्रपती शाहू महाराज राज्यभिषेक दिन शासनाच्या कागदावर आणण्याचा प्रयत्न सफल झाला. भविष्यात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळांची बैठकही अजिंक्यताऱ्यावर होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

     

    बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 1 लाख रुपयांची मदत

    किल्ले अजिंक्यताऱ्याला उर्जिंतावस्था आणण्यासाठी पालिकेने घेतलेल्या ठरावानंतर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, 11 वा हा स्वाभिमान दिन साजरा होत असून याला ऐतिहासिक महत्व आहे. ऍड. बनकर यांनी जो महत्वाचे विषय मांडला अजिंक्यताऱ्याच्या संर्वर्धनाचा तो खूप महत्वाचा आहे. सर्वतोपरी सहकार्य बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
    नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना समितीच्या वतीने किल्ल्यावरील पहिली सभा आयोजित करण्याच्या प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले.

     

     


Tags: ajinkyataraajinkyatara fortgood newssatarasatara municipal councillअजिंक्यताराकिल्ले अजिंक्यताराचांगली बातमीसातारासातारा नगरपालिका
Previous Post

#चांगलीबातमी जन-औषधीची ४८४ कोटी रुपयांची विक्री, एक रुपयाच्या सॅनिटरी पॅडची एक कोटी विक्री

Next Post

#मस्तच एक राजकुमार असाही, शहामृगासोबत लावली शर्यत, जिंकलाही!

Next Post
Dubai Crown Prince race

#मस्तच एक राजकुमार असाही, शहामृगासोबत लावली शर्यत, जिंकलाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!