मुक्तपीठ टीम
आता विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हालाही विमान प्रवास करताना वाय-फायच्या माध्यमातून तुमच्या आवडीचे चित्रपट आणि वेबसीरीज पाहता येणार आहे. एअर एशियाने क्लाउड टेक्नॉलॉजी कंपनी शुगर बॉक्ससोबत भागीदारी करून त्यांच्या सर्व विमानांमध्ये इन-फ्लाइट वाय-फाय प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे एअर एशियाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑन-बोर्ड प्रणालीद्वारे ओटीटी अॅप्सवरील वेब सिरीज, बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांचा आनंद घेता येईल.
एअर एशिया इंडियासोबत अनेक वैशिष्ट्यांसह ‘एअरफ्लिक्स’ लाँच करण्यासाठी भागीदारी करताना शुगरबॉक्सला आनंद झाल्याचे, सह-संस्थापक रोहित परांजपे यांनी सांगितले. ‘एअरफ्लिक्स’चा लाभ सर्व प्रवाशांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय स्थानिक वायफायद्वारे उपलब्ध होईल. आम्ही अत्यंत स्पर्धात्मक बाजारपेठेत उड्डाणाचा वेगळा अनुभव देण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्यास उत्सुक आहोत, असे एअर एशियाचे मुख्य विपणन अधिकारी सिद्धार्थ बुटालिया म्हणाले.
प्रवाशांना मिळणार या सुविधा!!
- एअर एशिया आणि शुगरबॉक्सची ही सेवा पेटंट क्लाउडक्षमतेवर आधारित आहे.
- युजर्सना कंटेंट पाहताना फ्लाइटमध्ये बफरिंग सारखी कोणतीही समस्या येणार नाही.
- युजर्सना 1Gbps पर्यंत स्पीड आणि 8TB स्टोरेज मिळेल.
- युजर्स फ्लाइटमध्येच बातम्या वाचण्यासोबत गेमिंगचा अनुभव घेऊ शकतील.
- तसेच, युजर्स ऑनलाइन शॉपिंग देखील आनंद घेऊ शकणार आहेत.