Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यात स्टार्टअपचे जाळे मुंबई-पुण्याबाहेर विस्तारण्यासाठी महाराष्ट्र काय करतोय?

वाचा प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या शब्दात

July 7, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Principal Secretary Manisha Verma

मुक्तपीठ टीम

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आदींसारख्या महानगरांमध्ये असलेले स्टार्टअप्स राज्याच्या इतर भागातही विस्तारले जावेत यासाठी राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत धोरणे आखण्यात येत आहेत, अशी माहिती, विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांची स्टार्टअप रँकिंग जाहीर करण्यात आली. यामध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने ‘टॉप परफॉर्मर’ क्रमांक पटकवला. २०२१ च्या आवृत्तीच्या या क्रमवारीची घोषणा आणि विजेत्या राज्यांचा सत्कार समारंभ केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली येथे संपन्न झाला. विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांनी हा पुरस्कार स्विकारला.

Maharashtra had been the ‘Top Performer’ in the list of the Center Government’s #StartUp ranking. This is because of various policies, decisions, conducive atmosphere of the state and the ecosystem for Start-Ups and entrepreneurship development- Principal Secretary Manisha Verma pic.twitter.com/kA6AqzKMVB

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 5, 2022

राज्याला स्टार्टअप हब बनविण्याचे ध्येय – प्रधान सचिव मनिषा वर्मा

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना श्रीमती वर्मा म्हणाल्या की, राज्य शासनाने स्टार्टअप आणि उद्योजकता विकासासाठी राबविलेली विविध धोरणे, निर्णय, राज्यातील पूरक वातावरण, अनुकूल इकोसिस्टीम याची ही फलश्रुती आहे. केंद्र शासनामार्फत मिळालेल्या पुरस्कारामुळे यापुढील काळातही अधिक प्रभावी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. उद्योजकता आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात अनुकूल धोरणे राबविण्यात येत आहेत. राज्य शासन, उद्योजक, स्टार्टअप्स, एंजेल गुंतवणुकदार, इनक्युबेटर्स या सर्वांच्या सहभागातून स्टार्टअप्सच्या विकासाला चालना मिळाली आहे. स्टार्टअप यात्रा, स्टार्टअप सप्ताह, इनक्युबेटर्सची निर्मिती, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमार्फत युवकांमध्ये उद्योजकतेला चालना, विद्यापीठांमध्ये इनक्युबेटर्स, स्टार्टअप्सना पेटंटसाठी अनुदान अशा अनेक निर्णयांमुळे राज्यात स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. राज्याला प्रमुख स्टार्टअप हब बनविण्याचे आमचे ध्येय आहे. सर्वांच्या सहभागातून याला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

श्री. कुशवाह म्हणाले की, राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी आणि उद्दिष्ट ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. नाविन्यपूर्ण दृष्टीकोण व प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात नाविन्यपूर्ण उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी नाविन्यता सोसायटी यापुढील काळातही विविध उपक्रम राबवेल, असे त्यांनी सांगितले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसचे प्रमुख आणि केसीआयआयएलचे संचालक प्रा. भूषण एल. चौधरी यांनीही या कामगिरीत योगदान दिले.

महाराष्ट्रात १३ हजार ४५० स्टार्टअप्स

केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार मंत्रालयामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. देशातील एकूण ७२ हजार ७०२ मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी १३ हजार ४५० स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. याबरोबरच राज्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत स्टार्टअप्सही आहेत. यामध्ये मुंबई महानगर प्रदेशात १४ हजार ७१०, पुण्यामध्ये ८ हजार ६०३, नागपूर मध्ये २ हजार ०५२, तर सिंधुदूर्गमध्ये ३६ स्टार्टअप्स आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये ३२ तर नंदुरबारमध्ये ३७ स्टार्टअप्स आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २५ ते ३० स्टार्टअप्स आहेत.
याबरोबरच देशभरात २०२१-२२ आर्थिक वर्षात सुरु झालेल्या ४४ स्टार्टअप्स यूनिकॉर्नपैकी ११ यूनिकॉर्नस महाराष्ट्रातील आहेत. यूनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन ७ हजार ५०० कोटी ते 75 हजार कोटी रुपये आहे.

स्टार्टअपच्या विकासाचा चढता आलेख

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांची स्टार्टअप रँकिंग जाहीर करण्यात येते. रँकिंग जाहीर करण्याची यंदाची ही तिसरी आवृत्ती होती. या रँकिंगमध्ये २०१८ च्या आवृत्तीत महाराष्ट्र हे उदयोन्मुख राज्य श्रेणीमध्ये होते तर २०१९ च्या आवृत्तीत नेतृत्व श्रेणीमध्ये होते. आता २०२१ च्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्राने ‘टॉप परफॉर्मर’च्या श्रेणीमध्ये स्थान मिळविले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careergood newsGovernment of MaharashtraJob-Business-Educationmaharashtra startupsmuktpeethmumbaiPrincipal Secretary Manisha Vermapuneकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपुणेप्रधान सचिव मनीषा वर्मामहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र स्टार्टअप्समुक्तपीठमुंबई
Previous Post

इन्फ्रारेड प्रकाशाला नवीकरणीय उर्जेत रुपांतरीत करणाऱ्या नवीन घटकाचा शोध

Next Post

स्विच बाईकच्या 360डिग्री फोल्डेबल ३ इलेक्ट्रिक बाइक्स! जाणून घ्या वेगळे फिचर्स…

Next Post
svitch bikes

स्विच बाईकच्या 360डिग्री फोल्डेबल ३ इलेक्ट्रिक बाइक्स! जाणून घ्या वेगळे फिचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!