मुक्तपीठ टीम
मुंबई क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणात शाहरुखच्या मुलानंतर आता चंकीची मुलगी अनन्या पांडेही आल्याचे दिसत आहे. एनसीबीची टीम शाहरुखच्या बंगल्यावर पोहचली असतानाच अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आले. ती तिचे वडील चंकी पांडेसोबत पोहचले आहेत. शाहरुखच्या बंगल्यावर एनसीबीची टीम फक्त नोटीस बजावण्यासाठी गेल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.
एनसीबीचे अधिकारी आज शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर बातम्या येण्यास सुरुवात झाली की त्यांच्या घराची म्हणजे मन्नतची झडती घेतली जाईल. पण नंतर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ते फक्त नोटीस देण्यासाठी येथे आला होता.
शाहरुखच्या मुलानंतर एनसीबीच्या फेऱ्यात आता चंकी पांडेची मुलगी आली आहे. एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावरही छापा टाकला आहे. एनसीबी अधिकाऱ्याने अनन्या पांडेला दुपारी २ वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार आता अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात पोहोचली आहे. तिचे वडील चंकी पांडेही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.
चर्चेनुसार अनन्या पांडेचा संबंध आर्यन खानच्या चॅटशी जोडला जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतीतच अनन्याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बोलावले आहे आणि चौकशीसाठी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.








Subscribe