मुक्तपीठ टीम
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी गुरुवारी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलमध्ये जगाचा निरोप घेतला. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनची कमान आता त्यांचे सुपु्त्र प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. म्हणजे प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे पुढचे राजे असतील. ब्रिटनचे राजघराणे खूप प्रसिद्ध आहे. या नव्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असणाऱ्या जगातील सर्वात जुन्या लोकशाहीतील राजघराण्याची कहाणी समजून घेणं महत्वाचं आहे.
लिंक क्लिक करा, सबस्क्राइबचे बटन दाबा आणि मुक्तपीठ यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा
https://www.youtube.com/c/Muktpeeth
ब्रिटिश राजघराण्याचा इतिहास…
- १७०७ पर्यंत, इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये स्वतंत्र राजेघराणी राज्य करत होती.
- मे १७०७ मध्ये ब्रिटीश राजेघराण्यात ते सर्व सामील होण्यास सुरुवात झाली.
- राणी एलिझाबेथ द्वितीयचे आजोबा सम्राट किंग जॉर्ज पंचम होते.
- त्यांच्या पत्नीचे नाव मेरी ऑफ टेक होते.
- १८९४ ते १९०५ या काळात दोघांना सहा मुले झाली.
- किंग जॉर्ज आणि मेरी यांना सहा मुले होती, किंग एडवर्ड-आठवा, किंग जॉर्ज-VI, राजकुमारी रॉयल मेरी, ड्यूक ऑफ ग्लोसेस्टर, प्रिन्स हेन्री, ड्यूक ऑफ केंट, प्रिन्स जॉर्ज सहावा आणि प्रिन्स जॉन.
- यामध्ये प्रिन्स जॉनला अनेक आजार होते. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
- त्यापैकी चार जणांना स्वतःची मुले होती.
- त्यांचा मोठा मुलगा, किंग एडवर्ड आठवा यांना १९३६ मध्ये त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला सिंहासनाचा वारसा मिळाला.
अशी झाली एलिझाबेथ द्वितीयची राणी एलिझाबेथ द्वितीय
- एडवर्ड आठव्याने १९३७मध्ये अमेरिकन घटस्फोटित वॉलिस सिम्पसनशी लग्न करण्यासाठी पदाचा त्याग केला.
- या दोघांना मूलबाळ नव्हते.
- किंग एडवर्ड आठव्या नंतर, त्याचा भाऊ राजा जॉर्ज सहावा याने सुमारे १५ वर्षे ब्रिटनची गादी सांभाळली.
- किंग जॉर्ज सहावा यांना त्यांची पत्नी राणी एलिझाबेथपासून दोन मुली झाल्या.
- त्यापैकी एक राणी एलिझाबेथ द्वितीय आणि दुसरी राजकुमारी मार्गारेट.
- किंग जॉर्ज सहाव्यांच्या मृत्यूनंतर, त्यांची मुलगी राणी एलिझाबेथ द्वितीय हिने ६ फेब्रुवारी १९५२ रोजी ब्रिटनचे सिंहासन स्वीकारले.
- एलिझाबेथ द्वितीय ही ब्रिटनवर सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी आहे.
- एलिझाबेथ द्वितीयने एडिनबर्गचा ड्यूक प्रिन्स फिलिपशी विवाह केला.
- दोघांना चार मुले आहेत.
- प्रिन्स चार्ल्स, प्रिन्सेस रॉयल ऍनी, ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड.
प्रिन्स चार्ल्स आता राजा…
- महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या शाही सिंहासनाची जबाबदारी त्यांचा मोठा मुलगा चार्ल्स याच्या हाती असेल.
- प्रिंस चार्ल्स यांचा जन्म १९४८ मध्ये झाला.
- प्रिंस चार्ल्स यांनी २९ जुलै १९८१ रोजी लेडी डायना स्पेन्सरशी लग्न केले.
- दोघांना विल्यम आणि हॅरी ही दोन मुले आहेत.
- १९९६ मध्ये चार्ल्स आणि डायना दोघेही वेगळे झाले.
- प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना १९९७ मध्ये पॅरिसमध्ये एका कार अपघातात मरण पावली.
- चार्ल्सने नंतर ९ एप्रिल २००५ रोजी कॅमिला पार्करशी लग्न केले.
- राणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूनंतर चार्ल्स यांना राजा घोषित करण्यात येईल.
- चार्ल्स आता ७३ वर्षांचे आहेत.
- चार्ल्स राजा झाल्यानंतर, त्याचा मोठा मुलगा, ड्यूक ऑफ केंब्रिज, प्रिन्स विल्यम, याला आता प्रिन्स ऑफ वेल्स म्हटले जाईल.
लिंक क्लिक करा, सबस्क्राइबचे बटन दाबा आणि मुक्तपीठ यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा
https://www.youtube.com/c/Muktpeeth