मुक्तपीठ टीम
ऑनलाईन गेमिंगच्या धोक्यापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने पालक आणि शिक्षकांना सल्ला दिला आहे. गेम डाउनलोड करताना वैयक्तिक माहिती देऊ नका आणि वेबकॅम, खासगी संदेश किंवा ऑनलाईन चॅटद्वारे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधू नका असंही सांगण्यात आलं आहे. याशिवाय मुलांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ओळख लपवण्यासाठी अवतार न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये, राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई बोर्ड यांना सेफ ऑनलाईन गेमिंग नावाचे सल्लागार जारी केली आहे. मंत्रालयाच्या सायबर तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, कोरोनामुळे शालेय विद्यार्थी गेल्या वर्षी मार्चच्या मध्यापासून ऑनलाईन क्लासरूममध्ये अभ्यास करत आहेत. त्यामुळे मुलांकडून मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढला आहे.
ऑनलाईन गेम्सचे शालेय विद्यार्थ्यांना व्यसन
- तंत्रज्ञानाच्या नवीन युगात, ऑनलाईन गेम मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
- ऑनलाइन गेम व्यसन हा एक सामान्य घटक आहे. कारण मुले संगणक, मोबाईल किंवा टॅबलेटमध्ये कधीही कुठेही हा गेम सहज खेळू शकतात.
- ऑनलाईन गेमिंगचे अनेक तोटे आहेत. सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात मुले अडकत आहेत.
गेमिंग कंपन्या भावनिकरित्या मुलांना अॅप खरेदी करण्यास भाग पाडतात. - पालकांना याची जाणीव नसते आणि त्यांचे मूल सायबर बुलिंगच्या जाळ्यात अडकते.
- त्यामुळेच ऑनलाईन गेमिंगच्या धोक्यांपासून मुलांना वाचवण्याचा सल्ला या अॅडव्हायजरीद्वारे देण्यात आला आहे.
- संबंधित शाळा शिक्षकांच्या माध्यमातून पालक आणि मुलांना ऑनलाईन गेमिंगच्या धोक्यांची जाणीव करून देऊ शकतात.
गेमिंगच्या धोक्याबाबत अॅडव्हायजरीचे महत्त्वाचे मुद्दे
- मुलांना समजावून सांगा की गेम डाऊनलोड करताना इंटरनेटवर कधीही वैयक्तिक माहिती देऊ नका.
- प्रौढ आणि अनोळखी व्यक्तींशी वेबकॅम, खाजगी संदेश किंवा ऑनलाईन चॅटद्वारे कोणत्याही प्रकारे संवाद साधू नका.
- यामुळे ऑनलाईन गैरवर्तन करणाऱ्यांशी संपर्क होण्याचा धोका वाढतो.
- ऑनलाईन गेमदरम्यान काहीतरी चूक झाल्यास, त्वरित थांबा आणि स्क्रीन शॉट घ्या. पोलिसांच्या सायबर सेलला त्याची तक्रार करा.
- ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गोपनियता राखण्यासाठी मुलांना जागरूक करा. या गोपनियतेचा अर्थ असा आहे की, त्यांना त्यांच्या ओळखीबद्दल म्हणजे त्यांचे नाव, शाळेचे नाव, जन्मतारीख, कुटुंब याविषयी कोणतीही माहिती देण्याची गरज नाही.
- ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांचे खाते तयार करताना त्यांनी त्यांची ओळख लपवणे चांगले आहे. असे नाव येथे ठेवा, जे कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाही. याला स्क्रिन नेम म्हणतात.
- मूल खेळत असलेल्या कोणत्याही खेळाचे वयाचे रेटिंग तपासा.
- धमकावल्यास तुम्हाला प्रतिसाद न देण्यास प्रोत्साहित करा आणि त्रासदायक संदेशांची नोंद ठेवा आणि गेम साईट प्रशासकाला याची तक्रार करा.
- मुलांना अॅप खरेदीपासून वाचवण्यासाठी आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार पालक ओटीपी आधारित पेमेंट पद्धती अवलंबू शकतात.
- पालक मुलांना अज्ञात वेबसाईटवरून सॉफ्टवेअर आणि अॅप्स डाउनलोड न करण्याचा सल्ला देतात. तसेच वेबसाईट्समधील लिंक्स, इमेज आणि पॉप-अॅपवर क्लिक करण्यापासून सावध राहण्यासाठी त्यांना जागरूक करा. कारण त्यामध्ये व्हायरस असल्याने संगणकाला हानी पोहोचू शकते. याव्यतिरिक्त, अश्लील साहित्य असू शकते.
- मुलांच्या वागण्यावर लक्ष ठेवा. जर काही असामान्य असेल आणि वागण्यात बदल असेल तर त्यांच्याशी मैत्रीपूर्णरितीने बोला आणि समस्या समजून घ्या.
- इंटरनेट व्यावसायिकांद्वारे मुलांना वेळोवेळी जागरूक करा.