Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

अहमदाबादच्या साखळी स्फोटांमधील ३८ दोषींना फाशी! मोठा निकाल, पण अॅड. उज्ज्वल निकमांचा काय इशारा?

February 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Adv Ujjwal nikam alert on Ahmedabad bomb blast death punishment

मुक्तपीठ टीम

गुजरातमध्ये २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने गेल्या मंगळवारी या प्रकरणी सुनावणी पूर्ण केली होती आणि यापूर्वीच ४९ जणांना दोषी ठरवले होते. देशात आजवर एकाच खटल्यात फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची ही सर्वात मोठी संख्या आहे. पण या निकालानंतर दहशतवादविरोधी आणि गुन्हेगारी खटल्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एक इशारा दिला आहे. फाशीची शिक्षा झाली, हे चांगलंच! पण न्यायालयीन आणि पुढची दयेच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करत वेळेत शिक्षेची अंमलबजावणी करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अशा आरोपींना जास्त वेळ रखडवत ठेवलं तर त्यांची सुटका कमी होवू शकते. या आरोपींच्याबाबतीत तसं होवू नये.

 

एकामागून एक स्फोटांनी अहमदाबाद हादरले

  • २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद ७० मिनिटांच्या कालावधीत २१ बॉम्बस्फोटांनी हादरले होते.
  • या हल्ल्यांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला होता तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते.
  • २००२ च्या गुजरात दंगलीचा (गोध्रा हत्याकांड) बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी हे हल्ले केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

 

मोठा गुन्हा, मोठी चौकशी, खटलाही…

  • अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनी पोलिसांनी सुरतच्या विविध भागातून अनेक बॉम्ब जप्त केले होते.
  • यानंतर अहमदाबादमध्ये २० आणि सुरतमध्ये १५ एफआयआर नोंदवण्यात आले.
  • न्यायालयाने सर्व ३५ एफआयआर एकत्रित केल्यानंतर २००९च्या डिसेंबरमध्ये ७८ आरोपींविरुद्ध खटला सुरू झाला.
  • एक आरोपी नंतर सरकारी साक्षीदार झाला.
  • या प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र त्यांची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.
  • खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने ११०० साक्षीदार तपासले.
  • तेरा वर्षांनी अखेर लागला निकाल!
  • गुजरातमध्ये २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाले होते.
  • न्यायालयाने १३ वर्षांनंतर या प्रकरणात ४९ आरोपींनी दोषी ठरवले.
  • या खटल्यातील २८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
  • तेरा वर्षांहून अधिक जुन्या खटल्यात न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये खटल्याची कार्यवाही पूर्ण केली होती.
  • २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने हे स्फोट घडवल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

 

अॅड. उज्ज्वल निकम यांनी इशारा दिला त्याचं कारण ठरलेलं प्रकरण कोणतं?

  • तीन दशकांपूर्वी महाराष्ट्रात एक भयानक बालहत्याकांड घडवलं होतं.
  • अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचे खून केले होते.
  • किरण शिंदे याच्या साथीने १९९० ते १९९६ या सात वर्षात १३ मुलांचे अपहरण आणि त्यातील ९ मुलांच्या हत्या त्यांनी केल्या.
  • पोलिसांनी शिताफीने तपास करून त्यांना अटक करून खटला भरला. फाशीची शिक्षा झाली.
  • सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांची फाशीची शिक्षा कायम राहिली.
  • पुढे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१४ मध्ये या आरोपींचा दयाअर्ज फेटाळून लावला.
  • पण दया अर्ज तीन महिन्यात निकाली काढणे आवश्यक असताना राष्ट्रपतींनी त्या अर्जावर निर्णय घेण्यास पाच वर्षे घेतले. निर्णयातील विलंबाचा लाभ देऊन फाशी माफ करण्याची मागणी आरोपींनी न्यायालयाकडे केली होती.
  • त्यांच्यातील एक आरोपी अंजना गावितचा मधल्या काळात मृत्यू झाला होता.
  • त्यांच्या मागणीनुसार फाशीची शिक्षा न्यायालयाकडून रद्द करण्यात आली.
  • त्याऐवजी न्यायालयाने गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. या दोघींचा गुन्हा माफीच्या लायकीचा नाही.
  • मात्र, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली, असे न्यायालयाने म्हटले.

Tags: Adv Ujjwal NikamAhmedabad Bomb Blastअहमदाबादअॅड. उज्ज्वल निकमसाखळी बॉम्ब स्फोट
Previous Post

तंबाखू सेवनाविरोधात लोकचळवळ व्हावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत मुंबईतील नागरिकांनी भाग घ्यावा

Next Post
Rajiv Nivatkar

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत मुंबईतील नागरिकांनी भाग घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!