Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सरड्यापेक्षाही वेगानं पक्ष बदलतात गोव्याचे काही आमदार! पाच वर्षात ६०% आमदारांचे पक्षांतर!

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने मांडलं गेलं वास्तव

January 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
goa assembly

मुक्तपीठ टीम

सरडा हा खूप सभोतालच्या परिस्थितीनुसार रंग बदलतो. मात्र, राजकारणी त्यांच्यापेक्षाही वेगानं बदलतात, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र, गोव्यातील राजकारणी हे पक्ष बदलण्याच्याबाबतीत सरड्यालाही लाजवणारे ठरल्याचे दिसत आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरच्या ताज्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात गोव्यातील किमान साठ टक्के आमदारांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्यात.

गोव्याचा विचित्र विक्रम

  • गोव्यात गेल्या पाच वर्षांत, जवळजवळ २४ आमदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले आहेत.
  • गोव्याच्या ४० सदस्यांच्या विधानसभेतील एकूण संख्याबळाच्या ६० टक्के आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.
  • गोव्याने पक्षांतरांच्या प्रकरणात एक विचित्र विक्रम केला आहे.
  • ज्याचे भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एकच उदाहरण आहे.
  • गोव्यात १४ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्यामुळे ही आकडेवारी मांडली गेली आहे.

 

आमदारकी सोडून पक्षांतर करणाऱ्यांची नावे नाहीत

  • एडीआरने सादर केलेल्या २४ आमदारांच्या यादीत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांची नावे नाहीत.
  • या तीन आमदारांनी २०१७ मध्ये काँग्रेस आमदार म्हणून विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
  • त्यानंतर त्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करून त्यांच्यावतीने नव्याने निवडणूक लढवली होती.
  • २०१९ मध्ये काँग्रेसचे १० आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले.

 

कोण कोण इथून तिथं?

काँग्रेसमधून भाजपा

  • जेनिफर मॉन्सेरेट (तालिगाव)
  • फ्रान्सिस्को सिल्व्हेरिया (सेंट आंद्रे)
  • फिलिप नेरी रॉड्रिग्ज (वेलीम)
  • विल्फ्रेड नाझरेथ मेनिनो डी सा (नुवेम)
  • क्लॅफसिओ डायस (कंकोलिम)
  • अँटोनियो कॅरानो फर्नांडिस (सेंट क्रूझ)
  • नीळकंठ हलर्णकर (तिविम)
  • इसिडोर फर्नांडिस (कॅनकोना)
  • चंद्रकांत कवळेकर
  •  रवी नाईक (फोंडा)

 

मगोपमधून भाजपा

  • दीपक पौसकर (संवरडेम)
  • मनोहर आजगावकर (पर्नेम)

 

गोवा फॉरवर्ड पक्षातून भाजपा

  • जयेश साळगावकर (साळीगाव)

 

काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेस

  • लुइझिन्हो फालेरो (नावेलीम)

 

२०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेले माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ यांनीही अलीकडेच टीएमसीमध्ये प्रवेश केला. २०१७ च्या निवडणुकीत, काँग्रेस ४० सदस्यांच्या सभागृहात १७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. परंतु, १३ जागा जिंकणारा भाजप अपक्ष आमदार आणि प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन करू शकला नाही.


Tags: Association of Democratic ReformsBJPCongressgoa assemblyGoa Forward PartyGoa MLAMgpmuktpeethtrinamool congressअसोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकाँग्रेसगोवा आमदारगोवा फॉरवर्ड पक्षतृणमूल काँग्रेसभाजपामगोपमुक्तपीठ
Previous Post

मुस्लिम नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद! हिंदू संघटनांची कारवाईची मागणी!!

Next Post

“नथुरामच्या आडून कोल्हे,पवारांवर देवेंद्रभक्त, संघीय पिलावळ, अण्णाबाज, आंबापैदासी यांना लिहिण्याचा नैतिक अधिकार नाही! गांधीवाद्यांचाही तोल गेला!”

Next Post
Proff Hari Narke on Amol Kolhe nathuram role

"नथुरामच्या आडून कोल्हे,पवारांवर देवेंद्रभक्त, संघीय पिलावळ, अण्णाबाज, आंबापैदासी यांना लिहिण्याचा नैतिक अधिकार नाही! गांधीवाद्यांचाही तोल गेला!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!