मुक्तपीठ टीम
मुंबई मनपाच्या क्षेत्रात कोरोना लसीकरणाचे काम जोरात सुरु आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसींची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान मुंबई मनपा आता लसीकरण कार्यक्रम सीएसआर निधीच्या मदतीने पुढे नेईल. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले.
आदित्य ठाकरेंनी सांगितले की, सरकारी संस्थांची मदत न घेता कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीतून लस साठा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा,ज्यांना लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे मात्र त्यांनी घेतलेला नाही अशा व्यक्तींसाठी जनजागृती मोहीम राबवावी, तसेच दोन डोस घेतले असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जे जोखीमग्रस्त असू शकतात, अशा नागरिकांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री ठाकरे यांनी दिले.
मनपा प्रशासन स्वतः लस खरेदी करण्यास अयशस्वी ठरली आहे. जागतिक निविदा काढल्यानंतरही मनपाला ही लस मिळू शकली नाही. १० कंपन्यांनी ही लस देण्यास होकार दर्शविला, परंतु कोणाशीही बोलणे होऊ शकले नाही. मुंबईत आतापर्यंत १७ टक्के लोकांना लसचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, तर ५० टक्क्यांहून अधिक लोकांना पहिला डोस मिळाला आहे.
नमस्कार,मी राजेश घोणे मुक्तपीठ चा एक वाचक
आदित्य ठाकरेंची जी कल्पना आहे तशा पध्दतीने टाटा,रिलायन्स,महिन्द्रा या उदयोग समुहाने आधीच काम सुरू केले आहे.
मी महिन्द्रा अँन्ड महिन्द्रा (ट्रॅक्टर ,कांदिवली) येथे काम करत असुन आमच्या १००% कामगारांचे लसीकरण(दोन्ही डोस) झाले असुन त्यांच्या कुटुंबिया साठी सुध्दा कंपनीने लस उपलब्ध करून दिली मला माझ्या कंपनीचा अभिमान आहे.
आणी महत्वाचे आमच्या कंपनीत शिवसेनेचीच युनियन गेल्या ५० वर्षापेक्षा अधिक काळ आहे.
जय महाराष्ट्र राजेश घोणे
महिन्द्र अँन्ड महिन्द्र कांदिवली