मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाला नियंत्रित आणण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्येत घट झाली असताना मृत्यूची संख्या चिंता वाढवणारी आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन वाढणार की उठवणार यावर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाऊनबद्दल काय बोलले आदित्य ठाकरे?
- राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
- प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहेत.
- कोरोना रुग्णसंख्या किती आहे यावरच लॉकडाउन उठवला जावा की वाढवला जावा हे अवलंबून असेल.
- आरोग्य आणि सुरक्षा राज्य सरकारची प्राथमिकता असणार आहे.
आदित्य ठाकरे यांनी सीएनबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राज्यातील लॉकडाऊनवर भाष्य केलं आहे. “लॉकडाउन असला तरी राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडायला मिळेल असं विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणावर भर
- आदित्य ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेवरही भाष्य केलं.
- राज्यासाठी जास्तीत जास्त लस मिळवण्याचा प्रयत्न करत राज्य सरकार करत आहे.
- जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरु आहेत.
- “महाराष्ट्रात सर्वात जलद गतीने लसीकरणावर भर दिला आहे.
- राज्य सरकारने आतापर्यंत दोन कोटी लोकांचं लसीकरण केलं आहे.
- “सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाटेला रोखायचं असेल असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून त्यांना सुरक्षित करावे लागेल.
- ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी लसीसकरण करण्याचं आव्हान सध्या राज्यसरकार समोर आहे