मुक्तपीठ टीम
सुपरस्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या आदिपुरुष चित्रपटाबाबत एक माहिती समोर आली आहे. हे ऐकूणच आश्चर्य वाटेल. या चित्रपटाबाबतच्या नवीन अपडेटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दिग्दर्शक ओम राऊत या चित्रपटातील सैफची दाढी डिजिटल पद्धतीने काढण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटात तो रावणाची भूमिका साकारत आहे. सैफचा चित्रपटातील रावणाचा लूक पाहून सर्वत्र टीका करण्यात येत होत्या. त्यामुळे त्याची दाढी डिजिटल पद्धतीने काढण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
व्हीएफएक्समधील चुकांमुळे, ३० कोटींचा पुन्हा खर्च?
- चित्रपट निर्माते डिजिटल टूल्सद्वारे दाढी काढण्याचा विचार करत आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट खूप चांगला आकारला गेला आहे, त्यात फक्त व्हीएफएक्स चुकीचा आहे.
- फक्त सैफचा लूकच नाही, तर इतर अनेक पात्रांच्या अभिनयाने देखील प्रश्न उपस्थित होत आहेत.
- यासाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत असा अंदाज आहे.
आदिपुरूषमधील पात्रांच्या चित्रणावर आक्षेप!
- आदिपुरुष हे भारतीय महाकाव्य रामायणाचे सिनेमॅटिक रूपांतर आहे.
- या चित्रपटात प्रभास रामची भूमिका साकारणार आहे, तर क्रिती सेनॉन जानकीची भूमिका साकारत आहे.
- या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे तर सनी सिंह लक्ष्मणच्या भूमिकेत आहे.
- नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला, त्यावरून बराच गदारोळ झाला.
- पात्रांच्या चित्रणावर आक्षेप घेण्यात आला आहे.