मुक्तपीठ टीम
मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यामुळे चित्रपटसृष्टीप्रमाणेच मराठी रसिक जगतही शोकमग्न झाले आहे. अंधेरीतील घरी त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनानंतर दुपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंधेरी पूर्व येथील पारसीवाडा स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल.
शतक झळकवण्याची इच्छा अपूर्ण राहिली…
- अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी शतक झळकवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
- मात्र, वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
- तेथेच त्यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
- त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
ठाकूरांचे देव झाले…
- देवांचं खरं नाव ठाकूर ते मुळचे राजस्थानचे.
- त्यांचे वडिल कोल्हापूरमधील प्रख्यात फौजदारी वकील होते.
- एका न्यायालयीन प्रकरणातील कामगिरीनंतर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचं देवासारखे धावलात असे म्हणत कौतुक केलं.
- तेव्हापासून कोल्हापूरकरांनी ठाकूरांना देव असेच संबोधण्यास सुरुवात केली.
- त्यामुळे ठाकूरांचे नाव बदलून देव झाले.
चौफेर कामगिरी, अप्रतिम गुणवत्ता!
- रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक होते.
- त्यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ कोल्हापुरमध्ये झाला.
- रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या.
- आलिया भोगाशी सिनेमाच्या वेळी रमेश देव आणि सीमा देव एकत्र आले.
- १९६२ मध्ये अभिनेत्री सीमा देव यांच्यासोबत लग्न केले.
- रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले.
- या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले.
अभिनय क्षेत्रात मोठी इनिंग…
- रमेश देव यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारली
- रमेश देव यांनी “आंधळा मागतो एक डोळा” (१९५६) चित्रपटातून अभियक्षेत्रात पदार्पण केले. पण त्याआधी पाटलाची पोर या चित्रपटात ते १९५१ मध्ये बालकलाकार म्हणून झळकले होते.
- त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी २८५ हिंदी सिनेमे, १९० मराठी सिनेमे आणि ३० मराठी नाटकांत काम केले आहे.
- रमेश देव यांनी ३० जानेवारीला आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता.
मराठीप्रमाणेच हिंदीतही ठसा!
- रमेश देव “आनंद” आणि “ताकदीर” या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात.
- रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आहेत. १९७१ साली “आनंद” आणि “ताकदीर” या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात.
- त्यांनी ‘सीमा देव’ या नामांकित अभिनेत्रीशी लग्न केले. या दोघांना अजिंक्य आणि अभिनय हे दोन मुलगे आहेत.
- सीमा आणि रमेश दोन यांनी पती, पत्नी आणि प्रेमी म्हणून अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.
- तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘भाग्यलक्ष्मी’ या चित्रपटांत काम केले.
- रमेश यांनी “दस लाख” (१९६६) चित्रपटात मनोहरची भूमिका केली होती. देव यांना ‘मुजर्मि’, ‘खिलौना’ आणि ‘जीवनमृत्यु’ या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली.
- रमेश यांनी “कोरा कागज” आणि “आखा दाव” चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ‘खुशी-दर’ (१९८२) चित्रपटात रामनाथनची भूमिका साकारली होती. त्याचे पुढचे सिनेमे “औलाद” आणि “घायल” होते.
- त्यांनी कौल साहबच्या रूपात २०१३ मध्ये “जॉली एलएलबी” चित्रपटात काम केले होते. २०१६ मध्ये त्यांनी ‘घायल वन्स अगेन’ चित्रपटात काम केले होते.
रमेश देव यांना मिळालेले पुरस्कार
- २०१३ मधील ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पीआयएफएफ) रमेश देव यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला आहे.
रमेश देवांनी अभिनय केलेले चित्रपट
- पाटलाची पोर १९५१ (बालकलाकार)
- आंधळा मागतो एक डोळा
- आनंद
- तकदीर
- जीवन मृत्यू
- मुजरिम
- पैशाचा पाऊस
- भाग्यलक्ष्मी
- देवघर
- जॉली एलएलबी
- राम राम पाव्हणं
- घायल वन्स
- आलिया भोगासी
- उमज पडेल तर
- आरती
- शिकार
- मस्ताना
- खिलौना
- एक धागा सुखाचा
- भिंगरी
- चंदी
- पिपाणी
- राजकारण
- विघ्नहर्ता …श्री सिद्धिविनायक
- गलगले निघाले…
- वासुदेव बळवंत फडके
- उल्फत की नायी मंजिलेन
- निश्चय
- घायल
- प्रतिबंध
- आजाद देश के गुलाम
- घराना
- घरवाली बाहरवाली
- सोने पे सुहागा
- गोरा
- मिस्टर इण्डिया
- कुदरत का कानून
- दिलजला
- शेर शिवाजी
- इनाम दस हज़ार
- खेल मोहब्बत का
- अल्ला रक्ख़ा पुलिस इंस्पेक्टर
- मेरा हक
- प्यार किया है प्यार करेंगे
- इलज़ाम
- रामकली
- पत्थर दिल
- एक चिट्ठी प्यार भरी
- हम नौजवान
- कर्मयुद्ध
- गृहस्थी
- फ़िल्म ही फ़िल्म
- मैं आवारा हूँ प्रेमनाथ
- तकदीर
- श्रीमान श्रीमती
- दौलत
- अशांती
- हथकड़ी
- खुद्दार
- दहशत
- बॉम्बे एट नाइट
- हीरालाल पन्नालाल
- यही है जिंदगी
- दो लड़कियाँ
- फकीरा
- आखिरी दाव इंस्पेक्टर वर्मा
- सुनहरा संसार
- ज़मीर
- एक महल हो सपनों का
- सलाखें
- रानी और लालपरी
- ३६ घंटे
- प्रेम नगर
- गीता मेरा नाम
- कोरा कागज अर्चना का चाचा
- कसौटी
- जैसे को तैसा
- जमीन आसमान
- जिंदगी जिंदगी
- जोरू का गुलाम
- बंसी बिरजू
- यह गुलिस्ताँ हमारा
- हलचल
- मेरे अपने
- संजोग
- बनफूल
- दर्पण
- सरस्वतीचंद्र
- मेहरबान
- प्रेम आणि खून
- पडछाया
- माझा होशील का?
- वरदक्षिणा
- माझी आई
- सुवासिनी
- जगाच्या पाठीवार
- पैशाचा पाउस
- उमाज पडेल तार
- साता जन्माचे सोबती
- देवघर
- गाठ पडली ठका ठका