मुक्तपीठ टीम
एखादी सेवा स्वस्त केली की तोट्याच्या बोंबा नेहमीच ठोकल्या जातात. पण रेल्वेला मात्र AC-3 ला Economy AC अशा स्वस्त स्वरुपात लागू करणं मोठा फायदा मिळवून देणारं ठरलं आहे. नवीन ‘इकॉनॉमी’ एसी-३ कोचमधून रेल्वेला पहिल्या वर्षात २३१ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
आकडेवारीवरून असे दिसून येते की, हे डबे सुरू झाल्यापासून, सामान्य एसी-३ श्रेणीतील कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. ‘इकॉनॉमी’ एसी-३ कोच ही तुलनेनं स्वस्त एसी रेल्वे प्रवास सेवा आहे. स्लीपर क्लासच्या प्रवाशांना ‘सर्वोत्तम आणि स्वस्त एसी प्रवास’ सेवा देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली होती.
या डब्यांचे भाडे सामान्य एसी-३ सेवेपेक्षा ६ ते ७ टक्के कमी आहे. एसी-३ टियर इकॉनॉमी क्लासमध्ये २१ लाखांहून अधिक लोकांनी प्रवास केला, यादरम्यान, रेल्वेने २३१ कोटी रुपये कमावले. हे डबे सुरू करणे रेल्वेसाठी अवघड होते, कारण भाडे जास्त नसल्याची खात्री करणे आवश्यक होते.
लाखो भारतीय रेल्वे प्रवाशांनी इकॉनॉमी एसी कोच सुविधेचा घेतला लाभ…
- एप्रिल-ऑगस्ट २०२२ मध्ये, १५ लाख लोकांनी नवीन इकॉनॉमी कोचमधून प्रवास केला आणि १७७ कोटी रुपये कमावले.
- हा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- या कालावधीत सामान्य एसी-३ वर्गातील प्रवाशांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही.
- याच कालावधीत सामान्य एसी-३ श्रेणीतून रेल्वेला ८ हजार २४० कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
- नवीन एसी-३ इकॉनॉमी क्लास कोचमध्ये ८३ जागा आहेत, तर सामान्य एसी-३ डब्यांमध्ये ७२ जागा आहेत. . नॉर्मल एसी-३ कोचमध्ये दोन बाजूचे बर्थ आहेत, जे नवीन कोचमध्ये तीन करण्यात आले आहेत.
- रेल्वेने आतापर्यंत अशा ३७० डब्यांचा प्रवास सेवेत समावेश केला आहे.