मुक्तपीठ टीम
भारतात १ ऑक्टोबरपासून अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे. एअरटेलने आजपासून ८ शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. हे रोलआऊट नावापुरतेच आहे असे नाही. उलट लोकांच्या फोनमध्ये 5G सिग्नलही येत आहेत.
तुमच्या स्मार्टफोनमध्येही 5G सिग्नल दिसतो का? जर एअरटेल यूजर असाल आणि 5G सक्षम असलेल्या कोणत्याही शहरात राहत असाल, तर 5G सेवा मिळेल. VoLTE किंवा 4G ऐवजी, तुमच्या फोनमधील नेटवर्कवर 5G दिसू लागेल.
एअरटेलने 5G सेवा सुरू केली
- भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेलने दिल्ली, मुंबई, वाराणसी, बंगळुरू, सिलीगुडी, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नई या आठ शहरांमध्ये 5G कनेक्टिव्हिटी आणली आहे.
- रोलआउटसोबतच लोकांच्या फोनमध्ये 5G सिग्नलही येत आहेत.
- लोकांना नेटवर्कवर VoLTE आणि 4G च्या जागी 5G चे चिन्ह दिसत आहे.
- जर कोणी एअरटेल यूजर असेल आणि या आठ शहरांमध्ये राहत असेल तर त्यांना 5G सेवा देखील मिळणे सुरू होईल.
- जर फोनमध्ये 5G सिग्नल येत नसेल तर फोनची सेटिंग बदलून नेटवर्क अपग्रेडही करता येते.
5G नेटवर्क कसे सेट करावे?
- सर्वप्रथम, तुम्हाला स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर सिम कार्ड आणि मोबाइल नेटवर्क्स किंवा कनेक्शन ऑप्शनवर जावे लागेल.
- येथून सिम कार्ड निवडावे लागेल आणि प्रीफर्ड नेटवर्कवर जावे लागेल.
- नेटवर्क मोडमधून, 5G ऑटो नेटवर्क निवडावे लागेल.
- यानंतर फोनला 5G नेटवर्क मिळू लागेल. या नेटवर्कवर तुम्हाला पूर्वीपेक्षा खूप चांगले नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी मिळेल.
- मात्र, 5G इंटरनेटसाठी तुम्हाला आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
जियोची 5G कनेक्टिव्हिटी
पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ या देशातील १३ प्रमुख शहरांमध्ये जियोची 5G कनेक्टिव्हिटी सुरू होणार आहे. लॉंच झाल्यामुळे अनेक लोकांच्या फोनमध्ये 5G नेटवर्क देखील दिसू लागले आहे.