मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्यातील वाद संपूर्ण देशाला माहित आहे. मात्र असताना काँग्रेस नेते अभिरंजन चौधरी यांनी वेगळाच आरोप केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संगनमत झाले असल्याचा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. अधीर रंजन चौधरी यांनी परस्पर विरोधी असणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी हे आपापसात डावपेच खेळी करत असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर ममता बॅनर्जी मोदींच्या शरम गेल्या आहेत जेणे करून त्या आपल्या पक्षाच्या नेत्यांना तपास यंत्रणांपासून वाचवू शकतील.
अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की,”आता दीदी आणि मोदी यांच्यात एक गुप्त संगनमत झाल्याचा संशय आहे. त्या मोदींना शरण गेल्या आहेत, जेणेकरून ते आपल्या पक्षाच्या नेत्यांना सीबीआय आणि ईडीपासून वाचवू शकतील…पीएम मोदी आणि ममता बॅनर्जी आपापसात डावपेच खेळी करत आहेत.
लखीमपूर खेरी घटनेचा संदर्भ देत चौधरी यांनी प्रियांका गांधींच्या अटकेचा निषेध केला. ते म्हणाले की, लखीमपूर खेरी घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रियांका गांधींना भेटायचे होते. “माझा अजूनही विश्वास आहे की, राजकारणात काही राजकीय शिष्टाचार असावेत. पण हे अत्यंत दुर्दैवी आहे की ममता बॅनर्जींकडून प्रियांका गांधींबाबत एकही विधान आले नाही.आमच्या मुख्यमंत्री एक महिला आहेत आणि प्रियांका गांधींवर त्यांचे मौन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बरेच काही सांगते.