Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मजूर आईच्या बाळाचं स्टेशनवरील झोक्यातून अपहरण, आठ तासात आरोपी जेरबंद, बाळाची सुटका!

May 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Palghar (1)

मुक्तपीठ टीम

बोईसर येथील अपहरणाच्या घटनेचा लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या आठ तासात छडा लावला आहे. बोईसर रेल्वे स्थानकावर झोका बांधून आठ महिन्याच्या बाळाला या झोक्यात झोपी घालून महिला मजूर रेल्वे ट्रॅक वर काम करत होती. तिच्या बाळाच अपहरण करण्यात आलं ही घटना लक्षात आली तेव्हा या मोलमजुरी करणाऱ्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. या महिलेने जोरात जोरात टाहो फोडला आणि याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनी या बाळाचा तात्काळ शोध सुरू केला. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले. सर्व रेल्वे स्थानकांना सूचना दिल्या गेल्या आणि अवघ्या आठ तासातच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आल. आरोपीला पकडून बाळाची सुखरूप सुटका केली. आपल्या कुशीत बाळ आल्यानंतर या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

वर्षा कन्हैया डामोर ही रेल्वे मजूर आपल्या आठ महिन्याच्या महिमा या मुलीला बोईसर रेल्वे स्टेशनवर झोळीत झोपून झोपवून पतीसोबत रेल्वे ट्रॅक वर काम करण्यासाठी गेली होती. या संधीचा फायदा घेत आरोपीने या मुलीला झोळीतून उचलून तेथून पलायन केले. वर्षासोबत काम करणाऱ्या तिच्या सहकारी महिलेला झोळीत बाळ नसल्याचे समजल्यानंतर तिने वर्षाकडे धाव घेतली आणि वर्षाला झोळीमध्ये बाळ नसल्याचं सांगितलं. वर्षांनी हातातले काम सोडून बाळाच्या झोळीकडे धाव घेतली तिथे आल्यानंतर तिला बाळ न दिसल्याने ती कावरीबावरी झाली आणि जोराजोराने टाहो फोडू लागली तातडीने त्यांनी बोईसर लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून बाळ पळवून नेल्याची तक्रार दिली.

Palghar (2)

पोलिसांनीही तत्परता दाखवून अज्ञाताने बाळ पळवून नेल्याचा गुन्हा तातडीने दाखल केला. त्यानंतर पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी तातडीने आपली तपास चक्रे फिरवली त्यानुसार त्यांनी अपहरणाची माहिती रेल्वे स्थानकावर हजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या जवानांना दिली. याच वेळेस मुरबे येथून रेल्वे स्थानकाकडे कामासाठी येत असलेले गृहरक्षक दलाचे जवान योगेश तरे यांना एक जण बाळ घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बाळाचा फोटो काढला व पोलीस ठाण्यात पाठवला. त्यानंतर हा फोटो त्या बाळाच्या आईला दाखवल्यानंतर हे बाळ आपलेच असल्याचे या महिलेने ओळखले व तातडीने पोलिसांनी जवान योगेश तरे याला संपर्क साधून आणि अतिरिक्त पोलीस बल पाठवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या .ही माहिती पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी दिली.

अवघ्या आठ तासात ही कारवाई पालघर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने केली. आरोपीला पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली असून पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी बाळाचा ताबा आई-वडिलांकडे दिला आहे. आपले बाळ मिळाल्याने बाळाच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त करत लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत. मुलांचे अपहरण करणाऱ्या आरोपीचे इतरही प्रकरणात काही संबंध आहेत का याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.


Tags: crimeLohmarg PolicePalgharअपहरणपालघररेल्वे मजूरलोहमार्ग पोलीस
Previous Post

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित समाज, राज्य निर्मितीसाठी एकत्र येऊया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ हे तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

Next Post
Amit Deshmukh

‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ हे तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!