मुक्तपीठ टीम
मराठा समाजातील तरुणांच्या सर्वांगीण आणि कौशल्य विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी संस्था आहे. पण या ‘सारथी’ संस्थेतही काही लोकांनी प्रचंड भ्रष्टाचार केला, असा आरोप झाल्याची आठवण मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी करून दिली आहे. त्यानंतर सारथीची चौकशी करण्यात आली. आता तरी हा चौकशी अहवाल सरकारने जाहीर करावा आणि संबंधित लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने सारथीसमोर पुन्हा एकदा आंदोलन होईल, असा इशाराच आबासाहेब पाटलांनी दिला आहे.
आबासाहेब पाटलांचा सरकारला इशारा
- मराठा समाजाच्या युवकांचा सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकासासाठी सारथी सारखी संस्था उभा राहिली.
- सारथीचा काही लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर केला, भ्रष्टाचार केला.
- यानंतर सारथीची चौकशी करण्यात आली.
- आता चौकशी पूर्ण झालेली असून, हा चौकशी अहवाल सरकारने जाहीर करावा.
- संबंधित लोकांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सारथी समोर पुन्हा एकदा आंदोलन होईल, असा इशाराच आबासाहेब पाटलांनी दिला आहे.
सारथीमध्ये गैरव्यवहारांचे आरोप
- मराठा समाजासाठी सारथी संस्था कार्यरत करण्यात आली.
- सारथीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे.
- अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे, पण सरकार अहवाल जाहीर करण्यात तयार नाही.
- सरकारनं लवकरात लवकर हा अहवाल जाहीर करावा, गैरव्यवहार करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावेत.
- अन्यथा सारथीच्या समोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्धारही आबासाहेब पाटलांनी बोलून दाखवला आहे.