मुक्तपीठ टीम
पंजाबात अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने इतिहास घडवताना दिसत आहे. आपच्या झाडूने काँग्रेस, अकाली दल, भाजपाला झाडून टाकले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिक आकडेवारीनुसार पंजाबच्या ११७जागांवरील जे कौल समोर आले आहेत, त्यानुसार आपने बहुमतासाठी आवश्यक ५९चा आकडा ओलांडत ८९ जागांवर आघाडी घेतली आहे. तिथं भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री असतील. आप या निकालामुळे असा प्रादेशिक पक्ष ठरला आहे, ज्याने एका छोट्या राज्यातील सत्तेनंतर दुसऱ्या मोठ्या राज्याची सत्ता मिळवली आहे. या मुळे पहिल्यांदाचा केजरीवालांच्या आपकडे पोलीस दलाचे नियंत्रण असलेले राज्य सरकार आले आहे. तसेच राज्यपालांचे अडथळे असले तरी नायब राज्यपालांसारखे अनिर्बंध अधिकार नसतील. ज्यामुळे अनेक बाबतीतील निर्णय घेणे आपच्या पंजाबमधील सरकारला शक्य झाले असते.
पंजाबचा कौल
एकूण जागा ११७
मतमोजणीतील जाहीर आघाडी ११७ जागा
पंजाबचा कौल
- आप ८९
- काँग्रेस १३
- अकाली दल ८
- भाजपा ०५
- बसपा ०१
- अपक्ष ०१
मतांच्या टक्केवारीत आपची जबरदस्त मुसंडी