मुक्तपीठ टीम
मुकुंदवाडी जालना रोड स्मशानभूमी येथे विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे हे दोन एप्रिल पासून आमरण उपोषणास बसलेले आहे. मुक्तपीठनं सरळस्पष्ट कार्यक्रमात त्यांच्या उपोषणाकडे सत्ताधारी आघाडी आणि विरोधक भाजपाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचं उघड केलं. त्यानंतर त्यांच्या समर्थनासाठी राज्यभरातून लोक पुढे येत आहेत. नवयुग क्रांति शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे यांच्या उपोषणास आम आदमी पार्टीचा पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आहे.
त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज आम आदमी पार्टी औरंगाबाद चे जिल्हाध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून गजानन खैरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि आम आदमी पार्टी शिक्षकांसोबत आहे आणि आमचा संपूर्ण पाठिंबा आहे अशी ग्वाही दिली.
२० टक्के आणि ४० टक्के अशा अंशतः अनुदानित शाळांना पूर्ण अनुदान देऊन सर्व शिक्षकांना सेवा सुरक्षा मिळावी या मागणीसाठी गजानन खैरे उपोषण करीत असून आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.
राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात प्रथम योगदान असणाऱ्या शिक्षकांना स्मशानभूमी पर्यंत नेऊन पोहोचवले हे आपले महाराष्ट्राचे शिक्षण धोरण आहे अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी याप्रसंगी माध्यमांशी बोलताना केली.
त्यांच्यासमवेत सदाशिव पाटील वि. का. स, पाषा खान, अंकुश आगे, शिवाजी पाटेकर, प्रशांत इंगळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते.
शिक्षकाचं स्मशानात उपोषण! ६ व्या दिवशी प्रकृती ढासळली!! राजकारणात दंग सत्ताधारी – विरोधकांचं जीवघेणं दुर्लक्ष!!
पाहा: