मुक्तपीठ टीम
आम आदमी पक्ष हा संघाचीच निर्मिती असून भाजपासाठीच बी टीमचं काम करत असल्याची टीका अनेकदा होत असते. आता दिल्लीमागोमाग पंजाबमध्येही आपने काँग्रेसची सत्ता हिरावून घेतल्यामुळे तसे घडत असावं, अशी चर्चा आहे. मात्र, आता आप मांडत असलेले मुद्दे हे थेट भाजपाला पर्याय म्हणून पुढे येण्याचा मानस दाखवणारे आहेत. काश्मीरमधील पंडितांच्या मुद्द्यावरील भूमिका, दिल्लीत तिरंगे ध्वजस्तंभ उभारण्याचा निर्णय तेच दाखवणारे आहेत. त्याचवेळी गुजरातमध्ये निवडणुका जवळ आलेल्या असताना आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तेथे रोज शो करत भाजपला बरे करण्याचं एकमेव औषध म्हणजे आम आदमी पक्ष असल्याचंही ठासून सांगितलं.
भाजपाचा पर्याय बनण्यासाठी आपची रणनीती
- काश्मिरी पंडितांसाठी आप आक्रमक
- बऱ्याच वर्षांनी अरविंद केजरीवाल हे आंदोलनकारी म्हणून दिल्लीच्या जंतरमंतरवरील आक्रोश रॅलीत सहभागी झाले.
- ही रॅली काश्मिरी पंडितांसाठी आयोजित करण्यात आली होती.
- आपची पाकिस्तानच्या दहशतवाद समर्थक धोरणांवर कडवट टीका
- दिल्लीतील आप सरकार दिल्लीत ३०० ठिकाणी तिरंगा ध्वजस्तंभ उभारणार आहे.
- भाजपाचा बालेकिल्ला, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे मूळ राज्य असणाऱ्या गुजरातवर आप लक्ष देत आहे.
- तेथे भाजपाने काँग्रेसचे हार्दिक पटेलांसह अनेक नेते फोडल्याने भाजपासाठी लढाई सोपी मानली जात होती.
- आता मात्र आप पक्षाची संघटनात्मक बांधणी वाढवत भाजपासमोर आव्हान उभं करत आहे.
- त्यामुळेच आपचे अरविंद केजरीवाल यांनी तेथे रोड शो केला.
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात रोड शो केला आणि तिरंगा यात्रा काढली. यावेळी त्यांनी भाजपा आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. गुजरातच्या जनतेला राजकीय बदल हवा आहे. गुजरातमधील जनता भाजपाला विटली आहे. भाजपला बरे करण्याचे एकमेव औषध म्हणजे आम आदमी पक्ष असल्याचे ते म्हणाले.
भाजपाला फक्त आपची भीती वाटते!!
- प्रत्यक्षात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी गुजरातमधील मेहसाणा येथे तिरंगा यात्रा काढली आणि रोड शो केला.
- यावेळी जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, भाजपाला फक्त आपची भीती वाटते कारण हा एक ‘प्रामाणिक आणि देशभक्त पक्ष’ आहे.
- जेव्हा लोक सत्ताधारी पक्षाविरोधात बोलतात तेव्हा भाजपा गुंडगिरीचा अवलंब करते.
- ते म्हणाले की, गुजरात आता भाजप आणि त्यांची ‘बहीण’ काँग्रेसला कंटाळला आहे आणि लोकांना बदल हवा आहे.
भाजपाला बरे करण्यासाठी एकच औषध म्हणजे आप!
- गुजरातमध्ये बदल घडवून आणणार असल्याचेही केजरीवाल म्हणाले.
- भाजपाला बरे करण्यासाठी एकच औषध आहे आणि ते म्हणजे आप.
- गुजरात भाजपाचे अध्यक्ष सीआर पाटील हेच सरकार चालवणारे खरे मुख्यमंत्री आहेत, तर भूपेंद्र पटेल नावाचे मुख्यमंत्री आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
- यादरम्यान केजरीवाल यांनी असा दावा केला की गुजरातमध्ये लोक मोठ्या संख्येने आपमध्ये सामील होत आहेत.
- आपची पक्ष संघटना गाव, शहर आणि बूथ स्तरावर मजबूत होत आहे.