मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचं ‘एकदम ओके!’ चांगलंच गाजलं. त्यानंतर ५० खोके, एकदम ओके देशभर गाजू लागलं. ते ताजं असतानाच पंजाबमध्ये सुद्धा ‘आप’मध्ये शिवसेनेसारखी फोडाफोडी करण्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड केला आणि भाजपाच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. पंजाबमध्येसुद्धा सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी भाजपाने आपल्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला.
भाजपाने आपचे हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. भाजपाने म्हटले आहे की, आप आपल्या अपयशावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे.
दूरध्वनीवरून संपर्क साधतेय भाजपा!!
- पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी आरोप केला की, भाजपाच्या ‘ऑपरेशन लोटस’चा भाग म्हणून राज्यातील काही ‘आप’ आमदारांशी संपर्क साधण्यात आला होता.
- ‘आप’च्या वरिष्ठ नेत्याने दावा केला की, ‘आप’च्या सात ते दहा आमदारांना पैसे आणि मंत्रिपदाच्या ऑफर देण्यात आल्या आहेत.
- चीमा म्हणाले की, पंजाबमधील आपच्या आमदारांशी संपर्क साधला जात आहे.
- आमच्या आमदारांना पक्षापासून वेगळे करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पाठवलेले काही भाजपा लोक त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आहेत.
भाजपाकडून ऑफर!!
- आमच्या आमदारांशी संपर्क साधत त्यांची दिल्लीतील ‘वड्डे बॉ जी’ आणि बड्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे आणि त्यांना २५ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.
- भाजपाने सरकार स्थापन केल्यावर आप आमदारांना मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा आरोप चीमा यांनी केला.
- अर्थमंत्र्यांनी पुढे आरोप केला, ‘तुम्ही तीन-चार आमदार आणाल तर तुम्हाला ५०-७० कोटी रुपयांची ऑफर दिली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते.’
भाजपाला पंजाबमध्ये १ हजार ३७५ कोटी रुपये खर्च करायचेत!!
- चीमा म्हणाले की, सरकार पाडण्यासाठी त्यांना फक्त ३५ आमदारांची गरज आहे, कारण ते इतर पक्षांच्या आमदारांच्या संपर्कात होते.
- आप सरकार पाडण्यासाठी भाजपाला पंजाबमध्ये १ हजार ३७५ कोटी रुपये खर्च करायचे आहेत, असा आरोप चीमा यांनी केला.
- तसेच, ते म्हणाले की भाजपाने ८०० कोटी रुपयांसह दिल्लीतील आपच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला.
- भाजपाने दिल्लीत लोकशाहीची ‘हत्या’ करण्याचा प्रयत्न केला आणि पंजाबमध्येही तोच प्रयत्न केला जात आहे, पण तो आपल्या प्रयत्नात यशस्वी होणार नाही, असा आरोप आप नेते चीमा यांनी केला.
भाजपाने ७-१० आमदारांशी संपर्क साधला
- चीमा म्हणाले की, आपचे आमदार, नेते आणि कार्यकर्ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत खडकासारखे उभे आहेत.
- चीमा यांनी कथितपणे संपर्क साधलेल्या आमदारांची नावे सांगण्यास नकार दिला, भाजपाने आपल्या लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सात ते १० आमदारांशी संपर्क साधला.
- संपर्क झालेल्या आमदारांच्या नावांबाबत चीमा यांना विचारले असता अनेक आमदारांचे फोन आले असल्याचे चीमा यांनी सांगितले. हा तपासाचा विषय आहे.