मुक्तपीठ टीम
सध्या आधार कार्डसंबंधित एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोदी सरकार सर्व आधार कार्डधारकांना ४ लाख ७८ हजार रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे लोकांना प्रश्न पडत आहे की, ही बातमी फेक आहे की खरंच, असं घडणार आहे.
व्हायरल मेसेजमध्ये काय सांगण्यात आले आहे?
- सोशल मीडियावर आधार कार्डधारकांबाबतच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
- यामध्ये केंद्र सरकार सर्व आधार कार्डधारकांना ४७ लाख ७८ हजार रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे.
- केंद्र सरकार आधार कार्डद्वारे कर्ज देत असल्याचे मेसेजमध्ये सांगण्यात आले.
- मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आली असून त्यावर स्पष्टपणे अर्ज करण्यास सांगितले जात आहे.
खरंच मिळणार ४ लाख ७८ हजार रुपये?
- पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने या बातमीची चौकशी करून यामागचे सत्य शोधून काढले आहे.
- तपास करत असताना टीमला आधार कार्डवरून कर्ज म्हणून ४ लाख ७८ हजार रुपये मिळणार असल्याची माहिती पूर्णपणे खोटे असल्याचे निष्पन्न झाले.
- पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मेसेज शेअर केला आणि लिहिले, हा दावा पूर्णपणे खोटा आहे.
- हा मेसेज इतरांना पाठवू नये असा सल्लाही दिला आहे.
- यासोबतच अशी सूचनाही करण्यात आली आहे की, व्यक्तीने कधीही आपली वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील इतरांसोबत शेअर करू नये.