मुक्तपीठ टीम
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये जोश भरण्यासाठी आता ए.आर.रहेमान यांनी संगीतबद्ध केलेलं ‘चीअर फॉर इंडिया’ हे गाणं गुंजू लागलंय. नवे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी हे लाँच केलं आहे. तरुण गायिका अनन्या बिर्लाने हे गाणं गायलं आहे. ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूंना सर्व भारतीयांनी प्रोत्साहन दद्यावे, असं आवाहन क्रीडा मंत्रालयाने केले आहे.
चीअर 4 इंडिया, हिंदुस्तानी वे!
या गाण्याचे शीर्षक ‘चीअर 4 इंडिया हिंदुस्थानी वे’ असे आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये विविध ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची यशस्वी कामगिरी दाखवण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले की, हे गाणे १८ महिन्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. या गाण्याच्या लाँचिंगच्यावेळी क्रीडा राज्यमंत्री नितीश प्रामणिक, क्रीडा सचिव रवी मित्तल, एसएआयचे संचालक संदीप प्रधान आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता उपस्थित होते.
The Official #Cheer4India Song is out now!!
#Tokyo2020
let’s all unite & cheer for Team India the #HindustaniWay @Cheer4India @PMOIndia @ianuragthakur @NisithPramanik @WeAreTeamIndia @arrahman @ananya_birlaWatch full song👇https://t.co/ejEIampdsY pic.twitter.com/HOgH4MxMsn
— India At Olympics (@Cheer4India) July 14, 2021
१२४ खेळाडू भारतातून
- या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून १२४ खेळाडू भाग घेत आहेत.
- यात ६९ पुरुष खेळाडू आणि ५५ महिला खेळाडूंचा समावेश आहे.
- अधिकारी व सहाय्यक कर्मचारी यांच्यासह भारतातील २२८ सदस्यांची टीम टोकियोला जाणार आहे.
भारत पदकाचे रेकॉर्ड करू शकतो
- ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत २८ पदके जिंकली आहेत.
- लंडन (२०१२) मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकली.
- तेथे भारतीय खेळाडूंनी ६ पदके जिंकली होती.
- या वेळी अशी अपेक्षा आहे की भारतीय खेळाडू नवीन विक्रम करतील.
- नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि हॉकीमध्ये भारताने पदके जिंकणे अपेक्षित आहे.