मुक्तपीठ टीम
नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिसव वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. नागपूरमध्ये १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सेवा बंद राहतील. लॉकडाऊन काळात शहरात कडक निर्बंध घालण्यात आले असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूरमध्ये काय सुरु व काय बंद?
- मद्य विक्री बंद
- डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकानं सुरु
- लसीकरण सुरु राहणार
- खासगी कंपन्या बंद, सरकार कार्यालये २५ टक्के क्षमतेने सुरू
- खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरू राहणार
- मार्च एंडिंगशी निगडीत लेखा विषयक कामांना परवानगी