मुक्तपीठ टीम
आपल्या साईंच्या शिर्डीतील लाडूंचा प्रसाद कोणाला आवडत नाही. पण कोरोना काळात ते बंद होते. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने भाविकांना मोफत लाडू प्रसाद वाटप पुन्हा सुरू केले आहे. मंदिराला भेट देणार्या लोकांच्या वाढत्या मागणीमुळे आता पुन्हा लाडू मिळतील. १६ नोव्हेंबर २०२० पासून कोरोना काळात मंदिर भक्तांसाठी पुन्हा सुरू झाले. परंतु ट्रस्ट अधिकाऱ्यांनी काळजी घेत प्रसाद वाटप टाळले होते. आता पुन्हा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ५० ग्रॅम वजनाच्या लाडूंचे पाकिट देण्यात येत आहे.
ट्रस्टने सर्व कोरोना सुरक्षा नियम पाळत लाडू बनविणे सुरू केले आहे. भाविकांना रांगेत लाडूची पाकिटे उपलब्ध करुन दिली जात आहेत. ट्रस्ट व्यवस्थापन कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहे. बिना मास्क घातलेल्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाही. मंदिर परिसरातील सोशल डिस्टन्सिंगचे कडक पालन केले जात आहे. वृद्ध, १० वर्षाखालील मुलांना आणि गर्भवती महिलांना परवानगी नाही.
पाहा व्हिडीओ: