Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“अपयशी सरकारचा, अर्थहीन अर्थसंकल्प!” मुनगंटीवारांची टीका

March 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
sudhir

मुक्तपीठ टीम

विदर्भ, मराठवाडा, खान्‍देशच्‍या जनतेची थट्टा करणारा अपयशी महाविकास आघाडी सरकारचा अर्थहीन व दिशाहीन अर्थसंकल्‍प असल्‍याची टिका विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

 

अर्थमंत्री अजीत पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पात विदर्भ, मराठवाडा, खान्‍देश या भागासाठी केलेल्‍या विकासात्‍मक तरतूदी सुक्ष्‍मदर्शी यंत्राने बघाव्‍या लागतील अशा आहेत. गेल्‍या वर्षभरात कोरोनाच्‍या प्रकोपामुळे जे संकट राज्‍याने अनुभवले त्‍यात उद्योग, सेवा, बांधकाम क्षेत्र, वस्‍तु निर्माण क्षेत्र, वाहतुक क्षेत्र, व्‍यापार क्षेत्र या सर्वच क्षेत्रांवर कोरोनाच्‍या संकटात प्रतिकुल परिणाम झाला. अनेक घटकांना आर्थिक विवंचनेचा फटका आजही सहन करावा लागत आहे. राज्‍यावरील ही आपत्‍ती लक्षात घेता ही सारी क्षेत्रे यामधून बाहेर पडण्‍यासाठी मोठे पॅकेज अर्थमंत्री म्‍हणून अजित पवार देतील अशी अपेक्षा राज्‍यातील जनतेला होती, पण अशा पध्‍दतीचे कोणतेही दिलासात्‍मक पॅकेज अर्थमंत्र्यांनी घोषित न करून राज्‍याची निराशा केली आहे.

 

गेल्‍या ६१ वर्षात प्रथमच राज्‍याचे दरडोई उत्‍पन्‍न १३३४६ रुपयाने कमी झाले आहे, पण कोणतीही गरीब कल्‍याण योजना अर्थमंत्र्यांनी घोषित केली नाही. जागतिक महिला दिनी अर्थसंकल्‍प अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, महिलांसाठी भरघोस तरतूद होईल अशी अपेक्षा होती. मात्र किरकोळ घोषणा करून महिलांना सुध्‍दा या सरकारने न्‍याय दिला नाही. डोंगर खणला, उंदीर निघाला या म्‍हणीच्‍या पूढे जात डोंगर खणला आणि उंदराचे चित्र निघाले अशी अवस्‍था या अर्थसंकल्‍पाची आहे. या अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन शक्‍तीशाली महाराष्‍ट्राच्‍या भविष्‍याचा वेध अर्थमंत्री घेतील अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना काळात निर्माण झालेले प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न सुध्‍दा या अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन केला गेला नाही. महाविकास आघाडी सरकारच्‍या घटक पक्षांचे शपथनामे, वचननामे यांचे प्रतिबिंब अर्थसंकल्‍पात दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र राज्‍यातील कष्‍टकरी, शेतकरी, गोरगरीब जनतेच्‍या तोंडाला अर्थमंत्र्यांनी पाने पुसल्‍याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


Tags: BJPMahavikaras Aghadi governmentsudhir mungantiwarअर्थमंत्री अजीत पवारअर्थसंकल्पजागतिक महिला दिनीसुधीर मुनगंटीवार
Previous Post

“सर्वांगीण विकासाला चालना देऊन महाराष्ट्राला समृद्ध करणारा अर्थसंकल्प”- बाळासाहेब थोरात

Next Post

“महिलांनो गरुड भरारी घ्या, तुमच्या पंखांना शासन बळ देईल!”

Next Post
Uddhav Thackeray in mask

"महिलांनो गरुड भरारी घ्या, तुमच्या पंखांना शासन बळ देईल!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!