Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठी ऊस कडूच…१८३पैकी १०४ साखर कारखान्यांकडून एकरकमी एफआरपी नाहीच!

March 7, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Sugar Factory (2)

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांपैकी निम्म्याहून अधिक कारखान्यांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण पैसे दिलेले नाहीत. १८३ साखर कारखान्यांपैकी फक्त ७९ कारखान्यांनी योग्य रक्कम दिली आहे.

साखर आयुक्त कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऊस गाळपात गुंतलेल्या १८३ साखर कारखान्यांचे एफआरपीनुसार देणे १६,२७५ कोटी रुपये आहे. आकडेवारीनुसार केवळ ७९ कारखान्यांनी फेब्रुवारीअखेरपर्यंत १३,९१७ कोटी रुपये भरले होते, तर इतरांनी २,३६७ कोटी अद्याप दिलेले नाहीत.

एकीकडे शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नसताना, साखर उद्योगातील काहींचा दावा आहे की, अनेक आर्थिक आणि इतर अडचणींचा सामना करूनही कारखाने एफआरपीनुसार पैसे देत आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत थकबाकीची रक्कम २,५३५ कोटी रुपये होती, जी कमी होत महिन्याच्या अखेरीस २,३६७ कोटींवर गेली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस ३८ कारखान्यांनी ८०-९०% बिले भरली असल्याचे दिसते. आकडेवारीनुसार, ३६ साखर कारखान्यांनी ६०-७०% बिले मंजूर केली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३९ कारखान्यांनी शेतकर्‍यांना ६० टक्क्यांपेक्षा कमी पैसे दिले आहेत.

गेल्या वर्षी १४१ साखर कारखाने गाळप करत होते. तर या हंगामात ही संख्या १८७ वर पोहचली. फेब्रुवारीच्या शेवटी महाराष्ट्रात सुमारे ८३२ लाख टन ऊस गाळप झाले आणि ८५६ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले. एका अंदाजानुसार सुमारे २०० लाख टन ऊसाचे गाळप बाकी आहे.

सध्याच्या गाळप हंगामात मागील १० वर्षातील सर्वाधिक गाळप होण्याची शक्यता आहे. परंतु, साखर आयुक्त कार्यालयाने महसूल वसुली कायद्यानुसार एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांना अद्याप कोणतीही नोटीस बजावलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की अनेक कारखान्यांनी शेतकर्‍यांशी कायदेशीर करारांची पळवाट शोधली आहे. त्या करारांनुसार शेतकऱ्यांनी त्यांना हप्त्यांमध्ये पैसे देण्याची परवानगी दिल्याचा त्यांचा दावा आहे. खरं तर कायद्यानुसार ऊस गाळप केल्याच्या १५ दिवसांच्या आत कारखान्यांनी शेतकऱ्यांना देय देणे बंधनकारक आहे. तसेच ते सारं देणं एकरकमी देणे बंधनकारक आहे. पण कायद्यातील प्रत्यक्षात घडत नाही.


Tags: FRPsugar cane farmerssugar millsऊस उत्पादक शेतकरीएफआरपीसाखर कारखाने
Previous Post

राज ठाकरेंचे नाणार प्रकल्पाला पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Next Post

दोन नारी सर्वांना भारी…७२ लाखाचे दारू दुकान, ५१० कोटींची बोली!

Next Post
Wine Shop -1

दोन नारी सर्वांना भारी...७२ लाखाचे दारू दुकान, ५१० कोटींची बोली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!