मुक्तपीठ टीम
काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. याच स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात मृतदेह सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांची हत्या झाली की, त्यांनी आत्महत्या केली अशे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणावर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सदर घटनेचा आणि मागील घटनांचा आढावा देत थेट ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे.
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारसंबंधित मनसुख हिरेन यांची चौकशी चालू होती. चौकशीदरम्यान हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने आता विरोधकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. यात चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला “आता तरी सरकारकडून निष्पक्ष चौकशी होईल ना?” अशा खोचक सवालाची विचारणा केली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले
कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी
आणि
आता मनसुख हिरेन…
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य…..
आणि
रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणार्या गोष्टी…….सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 5, 2021
चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले की, “महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडत आहेत अनेक धक्कादायक करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?”.
हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. सचिन वाझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाही, ते एटीएसचाही भाग नाहीत, तरी ही ते हिरेन यांच्या पोस्टमार्टम ठिकाणी हजर होते. यामुळे वाझे यांच्या उपस्थितीवर अधिक संशय निर्माण होतो. असे असल्याने याची चौकशी एनआयएकडे द्यावी अशीही मागणी आता केली जात आहे.