मुक्तपीठ टीम
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स व नोंदणी सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. जेणेकरून लोकांच्या आरटीओच्या फेऱ्या वाचतील. आधार ऑथेंटिकेशननंतर आता या सुविधा ऑनलाईन माध्यमातून मिळू शकतील. ज्यामुळे वेळेची बचत होईल आणि पैसाही वाचेल.
या निर्णयाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. प्रत्यक्षात दररोज हजारो लोक आरटीओकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्रांसाठी येतात. कधीकधी गर्दी इतकी वाढते की लोकांना तासनतास वाट पाहावी करावी लागते. इतकेच नव्हे तर गर्दी जमल्यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका देखील आहे. अशा परिस्थितीत आता लोक ऑनलाइन सेवांचा लाभ घेतील. आरटीओशी संबंधित १८ सेवा आता ऑनलाईन केल्या आहेत.
ऑनलाईन सुरू झालेल्या या सुविधांचा लाभ घेण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. आपल्याला फक्त parivahan.gov.in वेबसाइटवर जाऊन आपला आधार क्रमांक वेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. आधार वेरिफिकेशन झाल्यावर या १८ सेवांचा लाभ घेऊ शकतो.
पाहा व्हिडीओ: