मुक्तपीठ टीम
‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’ (NGF) ही शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांना त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेली प्रख्यात संस्था आहे. गेली ८ वर्षे ही संस्था “राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कारांद्वारे देशभरातील दिव्यांग बांधवांचा गौरव करते. त्यासोबत मागील दोन वर्षांपासून “राज्यस्तरीय आंतरशालेय दिव्यांग युवा महोत्सव” ही संस्था आयोजित करीत आहे. या महोत्सवात दिव्यांगांना गायन, नृत्य आणि वादन या विभागातील आपली कला सादर करता येते.
“NGF दिव्यांग युवा महोत्सव – २०२३” साठी महाराष्ट्रातील विविध शाळांनी आपल्या प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत असून एका शाळेला जास्तीत जास्त ६ प्रवेशिका सादर करण्याची मुभा असणार आहे. फक्त ‘विशेष शाळांनीच’ या प्रवेशिका सादर कराव्यात. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२३ असून हा महोत्सव फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईत होणार आहे.
विशेष शाळांतील अर्जदाराची मूलभूत पात्रता:
- सहभागींना कोणत्याही विशेष शाळेने नामांकित केले पाहिजे.
- सहभागींना “दिव्यांग” (२१ दिव्यांग श्रेणींपैकी कोणतेही) प्रमाणित केले पाहिजे.
- वयोमर्यादा नाही.
खालील विभागात स्पर्धा असेल :
- गायन – एकल / द्वंद्वगीत
- वाद्य – सोलो / बँड
- नृत्य – एकल / समूह
इच्छुक विशेष शाळांनी त्यांचे अर्ज कुरिअरद्वारे पूर्ण बायोडेटा/ संक्षिप्त प्रोफाइल, सादर करावयाच्या श्रेणी/अपंगत्वाची टक्केवारी (अधिकृत प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत) १५ जानेवारी २०२३ पूर्वी पाठवावेत किंवा nutangulgulefoundation@gmail.com वर इमेलद्वारे पाठवावी.
अधिक माहितीसाठी संपर्क
नूतन विनायक गुळगुळे
9819141906, 9920383446