मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले आहे. अहमदाबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून पंतप्रधान मोदी खूप भावूक झाले. त्यांनी ट्विटरवर एक भावूक श्रद्धांजली वाहिली.
हीराबेन यांचा जन्म १८ जून १९२३ मध्ये झाला होता. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांनी आज पहाटे ३.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. याच वर्षी १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला गेले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमृतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पणरुंड असा मोठा परिवार आहे.
आपल्या ट्विटमध्ये पीएम मोदींनी भावूक श्रद्धांजली वाहिली, “तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विसावलं आहे. आईत मला त्रिमूर्ती जाणवली…एका तपस्वीची यात्रा, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवन यांचा समावेश आहे.”
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
पीएम मोदींनी त्यांच्या आई संबंधित आणखी एक गोष्ट ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी त्यांना त्यांच्या १०० व्या वाढदिवशी भेटलो तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, जी नेहमी लक्षात राहते, “કામ કરો બુદ્ધિથી, જીવન જીવો શુદ્ધિથી” म्हणजे “बुद्धीने काम करा, शुद्धतेचं जीवन जगा!”
मैं जब उनसे 100वें जन्मदिन पर मिला तो उन्होंने एक बात कही थी, जो हमेशा याद रहती है कि કામ કરો બુદ્ધિથી, જીવન જીવો શુદ્ધિથી यानि काम करो बुद्धि से और जीवन जियो शुद्धि से।
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022