मुक्तपीठ टीम
भारतातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक म्हणजेच टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, रतन टाटा काल २८ डिसेंबर २०२२ रोजी ते ८५ वर्षांचे झालेत. व्यवसायाच्या जगात ते कितीही यशस्वी असले आणि लोकांच्या भोवताली असले तरी वैयक्तिक आयुष्यात ते अत्यंत एकाकी असतात. लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत ते एकटेच जगले. त्यांच्या या संघर्षाची कहाणी नक्की वाचा…
रतन टाटा प्रेमात पडले पण लग्न नाही केलं…
- १९३७ साली गुजरातच्या औद्योगिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
- रतन टाटा यांचे बालपण एकाकीपणात गेले.
- आई-वडिलांमधील मतभेदामुळे त्यांचे पालनपोषण त्याच्या आजीने केले.
- मोठा झाल्यावर ते प्रेमात पडले.
- ते तिला त्यांचे जीवनसाथी बनवू शकले नाही, ते लग्न करू शकले नाही.
- एकटेपणाची वेदना आजही रतन टाटांना सतावत असते.
का नाही झाले लग्न…
- रतन टाटा यांनी अद्याप लग्न केलेले नाही.
- लॉस एंजेलिसमध्ये ते एकदा प्रेमातही पडले होते.
- रतन टाटा त्यांच्या मैत्रिणीसोबत लग्न करणार होते.
- परंतू तेव्हा त्यांना भारतात परतायचे होते.
- त्यांची आजी खूप आजारी होती.
- रतन टाटा यांना वाटले की त्यांची मैत्रीण त्यांच्या प्रेमात भारतात येईल.
- पण १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धामुळे त्यांच्या आई-वडिलांनी तिला भारतात येऊ दिले नाही.
- त्यामुळेच त्यांचे प्रेम अपूर्ण राहिले.
एकटे राहणे काय असते हे तुम्हाला माहीत नाही: रतन टाटा
- एकदा स्वतः रतन टाटा यांनी त्यांच्या एकाकीपणाची व्यथा मांडली होती.
- ते म्हणाले होते, ‘तुम्हाला माहित नाही की एकटे राहणे काय असते? जोपर्यंत तुम्हाला एकट्यात वेळ घालवायला भाग पाडले जात नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही. जोपर्यंत तुम्ही खरोखर म्हातारे होत नाही तोपर्यंत कोणालाही म्हातारे झाल्यासारखे वाटत नाही.’
१९९१ मध्ये टाटा समूहाची सूत्रे हाती घेतली
- रतन टाटा यांनी १९५९ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.
- त्यांनी त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे पद भूषवले नाही.
- कंपनीच्या युनिटमध्ये त्यांनी कर्मचारी म्हणून काम केले.
- ते सर्व बारकावे शिकले.
- टाटा स्टीलचा पदभार स्वीकारण्यापूर्वी रतन टाटा यांनी ७० च्या दशकात टाटा स्टील जमशेदपूरमध्ये काम केले होते.
- यानंतर ते व्यवस्थापनात रुजू झाले आणि देशांतर्गत व्यवसायात व्यस्त झालेत.
- १९९१ मध्ये रतन टाटा यांनी प्रतिष्ठित टाटा समूहाची सूत्रे हाती घेतली.