मुक्तपीठ टीम
मध्य रेल्वेने कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी विविध ट्रेन्स आणि रेल्वे कोच ऑफर करून २.३२ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल प्राप्त केला आहे. हा महसूल गत वर्षातील कोणत्याही कॅलेंडर वर्षात मध्य रेल्वेला मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे. ८ फीचर फिल्म्स, ३ वेब सिरीज, एक डॉक्युमेंटरी, एक शॉर्ट फिल्म आणि जाहिरातीसह सुमारे १४ चित्रपटांचे चित्रीकरण मध्य रेल्वेच्या विविध ठिकाणी विविध चित्रपट निर्माते, प्रॉडक्शन हाऊसद्वारे केले आहे.
मध्य रेल्वेने सर्वाधिक १.२७ कोटी रुपयांचा महसूल ‘२ ब्राइड्स’ या चित्रपटाद्वारे मिळवला आहे. ज्याचे येवला येथे चित्रीकरण करण्यात आले होते, कान्हेगाव स्थानकावर विशेष गाडी द्वारे १८ दिवसांच्या शूटिंग माध्यमातून तसेच आपटा रेल्वे स्थानकावर तीन दिवसांसाठी विशेष ट्रेनच्या शूटिंग द्वारे रु. २९.४० लाख महसूल प्राप्त केला आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२२ या एका कॅलेंडर वर्षात चित्रपटाच्या शूटिंगद्वारे मध्य रेल्वेने रुपये २.३२ कोटी केलेली कमाई ही, गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२१ च्या तुलनेत ( रु. १.१७ कोटी) ९९ % एवढी जास्त आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे चित्रपट शूटिंग स्थान आहे, सनफिस्ट मॉम्स मॅजिकच्या जाहिरात चित्रपटासह ५ चित्रपटांचे चित्रीकरण या युनेस्कोच्या जागतिक वारसा रेल्वे स्थानकावर करण्यात आले आहे. पनवेलजवळील आपटा स्टेशन, पुणे ते कोल्हापूर मार्गावरील वाठार स्टेशन, मुंबईकरांसाठी उन्हाळ्यात ‘माथेरान’, परळ येथील सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स अकॅडमी कॉम्प्लेक्स, दादर, कर्जत, जुनी वाडीबंदर ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत , तसेच अहमदनगरमधील येवला, मनमाड आणि कान्हेगाव स्टेशन, अहमदनगर आणि आष्टी दरम्यान नवीन विभागातील नारायण डोहो यासारखे यार्ड लोकप्रिये आहेत .
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन, जुने वाडीबंदर यार्ड, वाठार (सातारा जवळ) आणि आपटा स्टेशन (पनवेल परिसरातील) यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांबद्दल धन्यवाद आणि त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय परवानगी देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल,” एका वरिष्ठ अधिकाऱ्याने धन्यवाद व्यक्त केले. स्लम डॉग मिलेनियर, कमिने, रब ने बना दी जोडी, रा-वन, रावन, दिलवाले दुलानिया ले जायेंगे कुछ कुछ होता है, दबंग, दरबार, रंग दे बसंती, बागी, खाकी, प्रेम रतन धन पायो आणि इतर अनेक हिट चित्रपट मध्य रेल्वेवर शूट झाले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही सर्वाधिक लोकप्रिय स्थानठरले आहे तसेच आपटा, पनवेल, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा , तुर्भे आणि वाडीबंदर सारखी रेल्वे यार्ड ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्वाधिक पसंतीची ठिकाणे आहेत . मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातून चित्रपटा शूटिंगला परवानगी दिली जाते , अलीकडेच चित्रपटाच्या शूटिंगच्या परवानगीला गती देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्यात आले आहेत , या सोप्या प्रक्रियेमुळे चित्रपट कंपन्यांना आवश्यक कागदपत्रांसह स्क्रिप्ट आणि अर्जासह आवश्यकता नमूद केल्या वर परवानगी मिळणे शक्य होत आहे.