मुक्तपीठ टीम
नशीब कधीही बदलू शकते. काही वेळा नशीब एखाद्याचे जीवन पूर्णपणे सकारात्मक तर एखाद्याचे जीवन पूर्णपणे नकारात्मक बदलते. असे म्हटले जाते की, वेळ कधीच कोणाची सारखी राहत नाही ती बदलते. शाहजेबच्या बाबतीतही असेच घडले. यूपीच्या सहारनपूर जिल्ह्यातील पांडोली गावात राहणारी इम्राना तिचा पती मोहम्मद नावेदच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांवर रागावून २०१९ मध्ये तिच्या माहेरच्या घरी यमुना नगरमध्ये निघून गेली होती. तिने तिच्या सहा वर्षांचा मुलगा शाहजेब यालाही सोबत घेऊन गेली होती. कोरोनामुळे शाहजेबच्या डोक्यावरून आईच छत्र हरपलं. त्याला भाकरीसाठी सर्वांसमोर हात पसरायला लागत असे. परंतू आता असा चमत्कार झाला की, चक्क दहा वर्षांचा मुलगा करोडोंच्या मालमत्तेचा मालक निघाला. त्याला हे यश कसे प्राप्त झाले? त्यामगचा त्याचा संघर्ष काय होता? या सगळ्याचे स्पष्टीकरण खालील बातमीत वाचा.
काय आहे शाहजेबची संघर्षाची कथा?
- आईचे छत्र हरपल्याने शाहजेब कालियार येथे वाईट जीवन जगत होता.
- चहा आणि इतर दुकानात काम करण्यासोबतच उदरनिर्वाहासाठी त्याला रस्त्यावर भीक मागावी लागली.
- त्याचे धाकटे आजोबा शाह आलम यांचे कुटुंबीय आता त्याला सहारनपूरला घेऊन गेले आहेत.
- निरपराधांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि सोशल साइट्सवर अपलोड करून नातेवाईकांनी शोधणाऱ्याला बक्षीस जाहीर केले होते.
- नातेवाइकांनी त्याचा खूप शोध घेतला मात्र काही सापडले नाही.
- कोरोना महामारी आली तेव्हा लॉकडाऊन होते.
- मोबीन कालियार हा दूरचा नातेवाईक आहे.
- त्याने शाहजेबला बाजारात फिरताना पाहिले तेव्हा व्हायरल झालेल्या फोटोशी त्याचा चेहरा जुळला.
- त्याला प्रशन विचारल्यावर शाहजेबने त्याच्या आईच्या नावासह गावाचे नाव बरोबर सांगितले आणि नंतर मोबीनने त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली.
- त्यानंतर ते गुरुवारी मुलाला घेऊन घरी गेले.
- मुलाची गावात वडिलोपार्जित घर व पाच बिघे जमीन आहे.
- त्याच्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्याच्या अर्ध्या मालमत्तेचा हिस्सा त्यांनी मृत्यूपत्रात त्याला दिला होता.
- मृत्यूपत्र लिहिल्यापासून नातेवाईक त्याचा शोध घेत होते.
आजोबांना आशा होती नातू मिळेल आणि नातू मिळाला…
- आधी सून घरातून निघून गेल्याने आणि नंतर मुलाचा मृत्यू झाल्याने आजोबा मोहम्मद याकुबला धक्का बसला होता.
- हिमाचलमधील एका शाळेतून निवृत्त झालेल्या याकूबचे सुमारे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.
- त्यांच्या दोन मुलांपैकी नावेद यांचे निधन झाले असून त्यांच्या मुलाचे नाव शाहजेब आहे.
- दुसरा मुलगा जावेद याचे कुटुंब सहारनपूरमध्येच राहत होते.
- आजोबांनी मृत्युपत्रात लिहून ठेवलं होतं की, माझा नातू जेव्हा परत येईल, तेव्हा अर्धी संपत्ती त्याच्या ताब्यात द्यावी.