Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

जी-२० : विकासासाठीचा डेटा आणि लाईफ (पर्यावरणस्नेही जीवनशैली) या विषयावरील चर्चेचा समारोप

December 16, 2022
in सरकारी बातम्या
0
जी २०

मुक्तपीठ टीम

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेटा म्हणजेच संकलित माहिती आणि आकडेवारीचा विकासासाठी उपयोग करणे आणि हवामान बदलविषयक कृती यावर भरीव आणि ठोस चर्चा झाली. या विकास कार्य गटाच्या चार दिवसीय बैठकांमध्ये झालेल्या पाच विधायक चर्चासत्रांची आज सांगता झाली.

तिसऱ्या सत्राअंतर्गत विकासासाठी डेटा या चर्चेची आज सुरुवात करतांना, विकास कार्य गटाचे अध्यक्षस्थान, सह सचिव नागराज नायडू आणि एनम गंभीर यांनी संयुक्तरित्या भूषविले. यावेळी, २०३० अजेंड्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना गती देण्याविषयी चर्चा झाली.

“…२०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टांची सिद्धता करण्यासाठी, सर्व देश प्रयत्न करत असतांना, आता जागतिक स्तरावर समस्याच्या निराकरणासाठी, डिजिटल उपाययोजना आणि प्रणालींवर लक्ष केंद्रित केले आहे जेणेकरून समाजहिताची कार्ये आणि सेवा प्रभावीपणे राबवल्या जाऊ शकतील,” असे या बैठकीत त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त संचालक (Meity) आणि डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप (डिजिटल अर्थव्यवस्था कृती गट) (DEWG) चे प्रतिनिधी  क्षितिज कुशाग्रा यांनी या समस्येचे परस्परावलंबी हितसंबंधविषयक स्वरूप आणि जी-२० चे दोन प्रवाह म्हणजेच ट्रॅक दरम्यानच्या समन्वयावर प्रकाश टाकला.

त्यानंतर, संयुक्त राष्ट्र महासचिवांचे  तंत्रज्ञानावरील विशेष दूत, अमनदीप सिंग गिल यांनी आरोग्य, शिक्षण, कृषी आणि अन्न सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये डेटा सेटचे डिजिटल इंटेलिजेंसमध्ये प्रभावी संकलन, साठा, विश्लेषण आणि रूपांतर करून त्यायोगे, विकास आणि सहकार्यासाठी निर्माण होऊ शकणाऱ्या जागतिक संधींची रूपरेषा मांडली.

शेवटी, जी-२० राष्ट्रांनी आपली मते मांडण्यास सुरुवात करण्यापूर्वी, संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकासविषयक परिषदेचे (UNCTAD)ट्रोबजर्न फ्रेड्रिक्सन यांनी विकासासाठी डेटाचा वापर करण्यास कितपत आणि कसा वाव आहे, याविषयचे त्यांचे विश्लेषण सादर केले.

यावेळी जी-२० सदस्य देशांनी, दर्जेदार आणि विश्वासार्ह डेटाची गरज, खाजगी क्षेत्र आणि नागरी समाजाची भूमिका, डिजिटल दरी कमी करण्यासाठीची आवश्यक पावले, विकसनशील राष्ट्रांमध्ये क्षमता वाढवणे आणि विकास कृती गटांच्याच्या कामांशी  डिजिटल आर्थिक कृती गटाच्या कार्याला जोडून घेणे,  यावर आपली मते मांडली.

चौथ्या सत्रात, पर्यावरणस्नेही जीवनशैली (LiFE) वर लक्ष केंद्रित करण्यात आले . भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, भारताने हवामान बदलाच्या समस्येवरील ठोस उपाय म्हणून याला प्रमुख प्राधान्य दिले आहे. “आपण पर्यावरणाचा कसा वापर करतो, याची पुनर्कल्पना करुन, ते प्रत्यक्षात आणण्यासाठीची व्यवस्था आपण कशी उभारू शकतो, हे महत्वाचे आहे,’ असे मत आणि DWG च्या सह-अध्यक्षा एनम गंभीर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.

भारताच्या प्राचीन शाश्वत परंपरांमधून प्रेरणा घेतलेला, LiFE हा शाश्वत जीवनासाठी एक धाडसी, परिवर्तनशील दृष्टीकोन आहे जो उपभोग (मागणी) आणि उत्पादन (पुरवठा) दोन्ही पद्धतींमध्ये जागतिक बदल सुचवतो. हा प्रस्ताव, – ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य’,या  भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या संकल्पनेशी, जी  सर्व जीवसृष्टींचे  परस्परसंबंध अधोरेखित करते आणि या सामायिक ग्रहासाठी या ग्रहावर राहणाऱ्या सर्वांवर समान जबाबदारी ठेवते, या संकल्पनेशीही जवळचा संबंध दाखवतो.

संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्थेचे (UNIDO) जुसेपे डी सिमोन आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमातील (UNEP) दिव्या दत्त यांचे सादरीकरण आर्थिक आणि धोरणात्मक आराखडा, जो LiFE ला डेटा-चालित परिप्रेक्ष्यांसह प्रदान केलेल्या पर्यायी मागणी-पुरवठा प्रतिमानाचे प्रमाण आणि परिणाम प्रतिनिधींना स्वीकारण्यास सक्षम करणारे होते. दत्त यांनी वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि क्रॉस-कटिंग धोरण बदलाच्या संदर्भात “शाश्वत जीवनशैली महत्वाकांक्षी बनवण्याचे” महत्त्व देखील मांडले.

जी-२० देशांच्या प्रतिनिधींनी शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) १२: ‘जबाबदार उपभोग आणि उत्पादना’ वर भारताचे लक्ष केंद्रित करण्याचे स्वागत केले. सोबतच, स्थानिक वास्तविकता आणि ज्ञान एकत्रित करण्यासाठी, व्याप्ती आणि प्रमाणाचे वर्णन करण्यासाठी तसेच या क्षेत्रातील बदलांना सक्षम आणि प्रोत्साहन देणारे धोरणात्मक उपाय ओळखण्यासाठीही प्रशंसा केली.

हे चर्चासत्र ,२०२३ जी-२० नवी दिल्ली अद्यतनित माहिती सत्र ५ सह, भारताच्या विकास कार्य गटाच्या (DWG) सह-अध्यक्ष गंभीर यांच्या टिप्पण्या आणि सादरीकरणासह तसेच परिणाम दस्तऐवजाच्या संदर्भाच्या अटींवर चर्चा आणि विकास कार्य गटाच्या सह-अध्यक्षांच्या समारोपाच्या टिप्पण्यांसह समाप्त झाले.

संध्याकाळी विकास कार्य गटाच्या सह-अध्यक्षांनी जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विकास कार्य गटाच्या उपक्रमांचे तपशीलवार आढावा  आणि भविष्यातील बैठकांसाठी गटाच्या योजनांबद्दल माहिती दिली. जी-२० प्रतिनिधींनी केंद्राच्या लॉनवर रात्रभोजनाचा आस्वाद घेतला.

सत्रांदरम्यान, प्रतिनिधींना भारतीय तंदुरी चाय (चहा) च्या अनोख्या चवीचा आनंद घेता आला; ज्यात गरम तंदूरमध्ये कुल्हड (छोटा मातीचा कप) ठेवण्यासाठी वापरलेल्या लोखंडी चिमट्याच्या धुराची चव मुरवलेली असते.

दोन दिवसांच्या गहन विचारमंथनानंतर, प्रतिनिधींना मुंबईच्या सांस्कृतिक आणि झपाट्याने वाढणाऱ्या शहरी महानगरात हरित मरुभूमी अनुभवण्याची संधी देण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफांची सहल उद्या नियोजित करण्यात आली आहे.


Tags: Data And LifeG 20डेटा आणि लाईफ
Previous Post

दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती इच्छूक नसलेल्या पालकांचे समुपदेशनही करणार

Next Post
Min Mangalprabhat Lodha Press Conf 2

आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती इच्छूक नसलेल्या पालकांचे समुपदेशनही करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!