मुक्तपीठ टीम
रस्ते अपघातात एअरबॅग सुरक्षा कवच म्हणून काम करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हे अपघाताच्या वेळी चालक आणि प्रवासी दोघांनाही गंभीर दुखातीपासून वाचवते. आतापर्यंत ही सुविधा फक्त चारचाकी वाहनांमध्ये उपलब्ध होती, मात्र आता दुचाकी वाहनांच्या हेल्मेटमध्येही हे कवच जोडले जात आहे. होय, इटालियन कंपनी एरोहने जबरदस्त सुरक्षा तंत्रज्ञानासह नवीन मोटरसायकल हेल्मेट उघड केले आहे, ज्यामध्ये एअरबॅग्ज असतील.
एअरबॅग हेल्मेटचे खास वैशिष्ट्य…
- एरोह या इटालियन कंपनीने एअरहेड नावाचे नवीन हेल्मेट लॉंच केले आहे, त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हेल्मेटमध्ये एअरबॅग्ज असतील जे गरजेच्या वेळी उघडतील.
- हे एअरबॅग हेल्मेट रायडरच्या डोक्याला दुखापत होण्यापासून वाचवतील.
- हेल्मेटचा बाहेरचा भाग अशा प्रकारे डिझाइन केलेला आहे की उघडल्यानंतरही डोके हलवायला भरपूर जागा असते आणि रायडरला जास्त दबाव जाणवत नाही.
एअरबॅग हेल्मेटमुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यास होणार मदत!
रस्ते अपघातांमुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला. यामध्ये दुचाकींमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हे हेल्मेट भारतात आल्यास रस्ते अपघात कमी होऊ शकतात.
हेल्मेटमध्ये ‘या’ गोष्टी असणे आवश्यक…
- कोणत्याही हेल्मेटला सेफ्टी रेटिंग मिळणे खूप महत्त्वाचे असते.
- भारतात हेल्मेटसाठी इतर सुरक्षा मानके आहेत जसे की, आयएसआय मानक, स्नेल मेमोरियल फाउंडेशन, सेफ्टी हेल्मेट असेसमेंट आणि रेटिंग प्रोग्राम, ईकॉनॉमिक कमिशन ऑफ यूरोप आणि परिवहन विभाग यामध्ये सर्वात सुरक्षित डीओटी चिन्हांकित हेल्मेट आहेत.
- हे सहसा ६५० सीसी आणि त्याहून अधिक पॉवर असलेल्या बाइकवर वापरले जातात.