मुक्तपीठ टीम
या वर्षी अनेक भारतीय चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली. हे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. कमाईच्या बाबतीतही या सिनेमांनी जबरदस्त व्यवसाय केला. त्याचप्रमाणे प्रेक्षकांनी गुगलवर बरेचसे चित्रपट सर्चही केले. आता गुगलने सर्वाधिक सर्च होणाऱ्या चित्रपटांची ही यादी जाहीर केली, ज्यामध्ये लोकांनी कोणते चित्रपट सर्वात जास्त सर्च केले हे सांगण्यात आले.
सर्वाधिक सर्च होणाऱ्या चित्रपटांची यादी…
१. ब्रह्मास्त्र पार्ट वन- शिव
- २०२२ हे वर्ष चित्रपट रसिकांसाठी जबरदस्त ठरले आहे.
- गुगलने एक यादी जारी केली आहे ज्यामध्ये भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेले चित्रपट सांगण्यात आले आहेत.
- यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपट ब्रह्मास्त्र पार्ट वन- शिव पहिल्या क्रमांकावर आहे.
- अयान मुखर्जीच्या चित्रपटात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, मोनी रॉय यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
- गुगलवर हा चित्रपट सर्वाधिक सर्च झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि जबरदस्त कमाई केली.
२. केजीएफ चॅप्टर-२
- साउथ सुपर हिरो यशचा चित्रपट केजीएफ चॅप्टर-२ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- हा चित्रपट केजीएफ-१ चा सिक्वेल असून यात संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज, मालविका अविनाश यांच्या भूमिका आहेत.
गुगलवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या चित्रपटांमध्ये, तिसऱ्या क्रमांकावर ‘द काश्मीर फाइल्स’ आहे. ज्यामध्ये अनुपम खेर, मिथुन, पल्लवी जोशी यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. तर आरआरआर चौथ्या क्रमांकावर आणि कंतारा पाचव्या क्रमांकावर आहे.
या वर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या चित्रपटांच्या यादीत कोणते चित्रपट?
- ब्रह्मास्त्र: पार्ट १- शिव
- के.जी.एफ: पार्ट २
- काश्मीर फाइल्स
- आरआरआर
- कंतारा
- पुष्पा
- विक्रम
- लाल सिंग चढ्ढा
- दृश्यम 2
- थोर: लव अॅंड थंडर