मुक्तपीठ टीम
संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुढील २४ दिवस भारत, अमेरिका आणि फ्रान्ससह सात देशांतील एअरफोर्स मल्टि-नॅशनल वॉरफेअर एक्सरसाइज ‘डेझर्ट फ्लॅग -६’ मध्ये सहभागी होतील. हा हवाई युद्धाभ्यास २७ मार्चपर्यंत चालणार आहे. युएईच्या अल-दार्फा एअरबेस येथे होणाऱ्या या हवाई युद्धाभ्यासामध्ये भारतीय हवाई दल आणि संयुक्त अरब अमिराती व्यतिरिक्त अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया आणि बहरेनचे हवाई दलही सहभागी होत आहेत. भारत पहिल्यांदा या हवाई युद्धाभ्यासात सहभागी होत आहे.
या हवाई युद्धाभ्यासामध्ये भारतीय हवाई दलाचे ६ सुखोई लढाऊ विमान, २ सी-१७ ग्लोबमास्टर्स आणि एक आयएल-७८ टँकरसह एकूण १५० वायुसैनिकांचा समावेश असेल. या संयुक्त हवाई युद्धाभ्यासात सुखोई व्यतिरिक्त फ्रान्सचे राफेल आणि अमेरिकेचे एफ-१६ सारखे लढाऊ विमानंही आपली शक्ती दाखवतील. या युद्धभ्यासाने सिम्युलेटेड एअर-कॉम्बेट एनवायरमेन्टमध्ये प्रत्यक्ष सरावाची मोठी संधी मिळेल. तसेच सहभागी देशांसोबत आंतरराष्ट्रीय संबंधही बळकट होतील. युएईच्या अल-दार्फा एअरबेस येथे आयोजित हा सराव या देशांना परस्परांच्या कार्यप्रणाली समजण्यास मदत करेल. यामुळे वायुसेनेच्या आंतर-कार्यक्षमतेतही वाढ होईल.
पाहा व्हिडीओ: