मुक्तपीठ टीम
भारतातील पेट्रोल-डिझेल कदाचित जगात सर्वात महाग असेल, पण जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा आपल्याच देशात उपलब्ध आहे. तर सर्वात महाग डेटा आफ्रिकेतील सेंट हेलेना या देशामध्ये आहे. एक जीबी डेटासाठी सेंट हेलेनातील नेटकरी तब्बल ३८,००० रुपये मोजतात, तर तुलनेत भारतात १ जीबी डेटाची सरासरी ७ रुपये किंमत आहे. भारतापेक्षा इंधन स्वस्त असणाऱ्या पाकिस्तानमध्येही डेटा मात्र भारतापेक्षा ७ पट महाग आहे.
भारताच्या शेजाऱ्यांकडे किती महाग डेटा?
• श्रीलंका ३७.२३
• चीन ४४.२३
• पाकिस्तान ५०.३७
• बांगलादेश ५१
• नेपाळ ६२.७८
• भूतान ८४.६८
पाहा व्हिडीओ: