मुक्तपीठ टीम
मराठवाड्यातील ११ मोठ्या सिंचन प्रकल्पात यावेळी उन्हाळा आला तरी ७६% टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा मागील पाच वर्षात नोंदलेल्या या जलाशयांमधील सरासरीपेक्षा दुप्पट आहे. ७५ मध्यम प्रकल्प आणि ७५२ लघु सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या अनुक्रमे ५८% आणि ४३% पाणीसाठा आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
नेहमी दुष्काळग्रस्त असणाऱ्या भागात यावर्षी उन्हाळ्यासाठी चांगला पाणीसाठा आहे. कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीचे जयसिंग हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. हा साठा संपूर्ण मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची गरज तसेच कृषी व औद्योगिक क्षेत्रातील मागण्या भागवू शकेल.
“मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये अगदी पाऊस उशीरा पडला तरी पुरेल इतके पाणी आहे. इथल्या सर्व मोठ्या धरणांमधून रब्बी पिकांना पाणीपुरवठा होत आहे. जलाशयांमधून मार्च ते जून या कालावधीत उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.”
पाहा व्हिडीओ: