मुक्तपीठ टीम
एफआयएस ग्लोबल या संस्थेने प्रचार-प्रसाराचा दौरा सुरू केल्यापासून सायबर हल्ले हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असेल असे सातत्याने म्हटले आहे. नुकतेच चीनी हॅकर्सनी सायबर हल्ला केल्याचे एक मोठे उदाहरण समोर आले आहे. गेल्या वर्षी लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन आणि भारतामध्ये झालेल्या संघर्षामुळे चीन सातत्याने भारतावर सायबर हल्ले करण्यात गुंतला आहे. भारताच्या आर्थिक राजधानीला अंधारात ठेवण्याचं प्रयत्न चीनने गेल्या वर्षी देशातील उर्जा प्रकल्पांवर सायबर हल्ला केला होता. तसेच अलीकडेच चीन पुरस्कृत हॅकर्सच्या एका गटाने लस निर्माता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारतातील भारत बायोटेकच्या आयटी प्रणालीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केले असल्याचेही एका अहवालातून समोर आले होते.
दोन्ही प्रकरणावर नजर टाकली तर असे लक्षात येईल की, कोरोना लसीच्या बाबतीत जगात भारताची वाढती प्रतिष्ठा चीनला पाहवत नव्हती, तर दुसर्या घटनेत गलवान खोऱ्यात आपल्या सैनिकांच्या मृत्यूमुळे संघर्ष निर्माण झाल्याने भारतातील संस्थांवर चीन सातत्याने सायबर हल्ले करत आहे.
सिंगापूर-टोकियो सायबर इंटेलिजेंस फर्मने असे सांगितले की, चीनचा हॅकर्स ग्रुप एपीटी-१० ने भारत बायोटेक आणि सीमर इंस्टीट्यूटच्या आयटी इंफ्रास्ट्रक्चरमधील त्रुटींना शोधून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, याप्रकरणी हे लक्षात आले की, सीमर इंस्टीट्यूटच्या आयटीशी जोडलेल्या सर्व्हरमध्ये काही त्रुटी होती.
दरम्यान, सर्वात गंभीर प्रकरण म्हणजे गेल्या वर्षी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वीज खंडीत करण्यात आली होती. १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईचा एक मोठा परिसर अंधारात गेला होता. त्यावेळी असा अंदाज केला जात होता की हे वीज ग्रीडच्या अपयशामुळे गेली होती. पण वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती, रुग्णालयातील वीज गायब झाली होती. तसेच ऑनलाइन परिक्षापासून स्टॉक एक्सचेंजपर्यंत सर्व काही तास बंद झाले होते. पण त्यावेळी मुंबईवर आलेल्या वीज पुरवठा खंडीत होण्यामागे चीनी हॅकर्सचा हात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच फक्त मुंबईतच नाही तर पूर्ण भारतातील वीज पुरवठा खंडीत करण्याची योजना असल्याचे म्हटले जात आहे. चीनचे हे षडयंत्र न्यूयॉर्क टाईम्समधून प्रसिद्ध झालेल्या अहवालात उघड झाले. या वृत्ताला महाराष्ट्र सरकारचे ऊर्जामंत्री यांनी दुजोरा दिला, पण केंद्र सरकारने यात काही तथ्य नसल्याचे म्हंटले आहे.
सायबर हल्ले म्हणजे काय?
- सायबर वॉरफेस किंवा सायबर हल्ले म्हणजे इंटरनेटद्वारे केल्या गेलेल्या गुन्हेगारी व दहशतवादी कारवाया, ज्याद्वारे एखादी व्यक्ती किंवा संस्था, देश, जग किंवा समाजाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करते.
- आत्तापर्यंत देशात अशा प्रकारे अनेक बेकायदेशीर कामे केली गेली आहेत, जसे की ऑनलाइन फसवणूक, बँकिंग कामकाजात हस्तक्षेप इ.
- परंतु सायबर वॉर किंवा दहशतवादाच्या हॅकिंगच्या रूपात असा चेहरा देखील असू शकतो ज्या वेबसाइट्स आणि आस्थापनांना लक्ष्य केले जाते ज्यांचे भारत सरकारशी काही संबंध आहे.
हॅकर्स बर्याच काळापासून हे करत आहेत, परंतु दोन देशात तणाव निर्माण करण्यासाठी सरकारी वेबसाइटना लक्ष करण्याचा विचार केला जात आहे. पण हॅकर्स केवळ वेबसाइटला हॅक करत नाही तर संस्थेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांचे लॉगइन, ईमेल, पासवर्ड्स, फोन नंबर, पासपोर्ट नंबर ही चोरी केले जातात आणि इतर वेबसाइटना पाठविले जातात.
संपूर्ण जगावर संकट
- हॅकर्सचे संकट एकट्या भारतावर नाही. अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियनसह जगातील अनेक देश या प्रकारच्या सायबर हल्ल्यामुळे त्रस्त आहेत.
- गेल्या काही वर्षात अमेरिकेसारख्या देशांच्या लष्करी संस्थांवर बरेच सायबर हल्ले झाले आहेत.
या हल्ल्यांचे दोन प्रकार आहेत, त्यातील एक म्हणजे संगणक प्रणालीला हानी पोहचविणे, जेणेकरून लोक त्यांचे उत्पादने खरेदी करू शकतील. - तर दुसर्या प्रकारच्या हल्ल्याला फिशिंग ट्रिप म्हणतात. त्यांचा संबंधित देशातील संवेदनशील माहिती मिळविणे हा आहे.
२००७ मध्ये ब्रिटीश गुप्तचर संस्था एमआय -५ चे महासंचालक जॉन्सन इव्हान्स यांनी असा इशारा दिला होता की, काही देशांमध्ये सायबर हल्ले करण्यात प्रभुत्व आहे. असा दावा केला जात आहे की सन २००३ पासून चीन आपल्या लष्करी हॅकर्सच्या मदतीने संपूर्ण जगाच्या संगणक नेटवर्कमध्ये खळबळ उडवित आहे. त्याच्या हॅकर्सनी अमेरिकन स्पेस एजन्सी-नासा आणि एफ -१६ लढाऊ विमान निर्माता कंपनी लॉकहीड मार्टिन यासारख्या संस्थांच्या वेबसाइट हॅक केल्या होत्या. पण चीनने अशा दावा केला आहे की, हॅकिंगचे हे काम बिगर सरकारी लोकांद्वारे केला जाऊ शकतो, पण संपूर्ण जग यावर सहमत नाही आहे.