मुक्तपीठ टीम
झूम अॅप एक व्हिडीओ मीटिंग प्लॅटफॉर्म आहे. झूम अॅपचा कोरोना काळात उद्भवलेल्या लॉकडाउनवेळी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मोठा फायदा झाला. पण हा फायदा फक्त युजर्सनाच झाला नाही, तर कंपनीला ही झाला आहे.
कंपनीचे उत्पन्न
- अमेरिकन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कंपनी झूमच्या उत्पादनात ३६९% वाढ झाली आहे.
- गेल्या तीन महिन्यांत कंपनीचे उत्पन्न ८८२.५ मिलियन डॉलर (अंदाजे ६४८१ कोटी रुपये) पर्यंत वाढले आहे.
- २०२० च्या चौथ्या तिमाहीत त्याचे उत्पन्न २६०.४ मिलिलन डॉलर (अंदाजे १९१२ कोटी रुपये) होते.
झूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक एस युआन म्हणाले, “आम्ही विश्वासू भागीदार आणि कुठूनही काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसोबत काम करत आहोत. यामुळे आमचे आर्थिक उत्पन्नही सुधारत आहेत. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आमच्या इनोव्हेटिव व्हिडीओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मची स्थिती अधिक मजबूत करू”.
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीचे उत्पन्न २,६५१.४ मिलियन डॉलर (सुमारे २० हजार कोटी रुपये) वर आहे. २०२२ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण ९०५ मिलियन (अंदाजे ६६४९ कोटी रुपये) उत्पन्नाची अपेक्षा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
झूम अॅपवर घेतला होता आक्षेप
गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान गृह मंत्रालयाने झूम अॅपच्या वापरासंदर्भात सल्ला जारी केला होता. त्यात असे म्हटले होते की, झूम अॅप सुरक्षित नाही. झूम अॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड नाही. म्हणजेच, कोणीही त्यावरिल मेसेज वाचू शकतो. हे सहजपणे हॅक देखील केले जाऊ शकते. तथापि, ३० मे २०२० रोजी अॅपला नवीन अपडेट आले. यामुळे सुरक्षिततेशी संबंधित सर्व समस्या आता संपुष्टात आल्या आहेत.