मुक्तपीठ टीम
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊतांना मिळालेल्या जामीन रद्द करण्यासाठी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे राऊतांना काहीसा दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांच्या जामिनाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीने कंबर कसली आहे, परंतु, उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला.
संजय राऊतांना दिलासा कायम!!
- पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीने पूर्ण तयारी केली आहे.
- ईडीकडून विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन देताना केलेल्या टिप्पणीच्या अनुषंगाने आपल्या याचिकेत काही बदल केले होते.
- या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणे अपेक्षित होते.
- परंतु, न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास नकार दिला.
- त्यामुळे आता ईडीला आता उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठासमोर नव्याने याचिका दाखल करावी लागले.
- परिणामी संजय राऊत यांना आणखी काही दिवस दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने ओढले होते ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे!
- याआधी विशेष न्यायालयाने संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते.
- कथित घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश व सारंग वाधवान यांना ईडीने अटकच केली नाही.
- त्याच प्रकरणात स्पष्टपणे दिवाणी वादाचे स्वरुप असूनही त्या प्रकरणाला मनी लाँड्रिंग प्रकरणाचा शिक्का लावून ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली आणि संजय राऊत यांना तर कोणत्याही कारणाविना अटक केल्याचे दिसते, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते.