मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका २३ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहिती आयोगाने दिली आहे. १३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ पेपर क्रमांक – २ (स्वतंत्र पेपर लिपिक-टंकलेखक) (लिपिक-टंकलेखक, – दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षा झाल्या होत्या. संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर उत्तरतालिका पाहण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
ऑनलाईन अर्ज मागविण्यासंबंधी आयोगाने दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजी https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर प्रसिद्धपत्रकातील सूचना व कार्यपद्धतीचे अवलोकन करावे. प्रसिद्धीपत्रकातील कार्यपद्धीतीनुसार इच्छुक तज्ज्ञ व्यक्तींनी आयोगाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावेत, अधिक तपशीलासाठी आयोगाचे https://mpsc.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी असे राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियंत्रक व सहसचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.