मुक्तपीठ टीम
भारताची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत १३ पटीने वाढून ४० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचलेली असेल, असे भाकीत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केले आहे. भारत सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि सध्या फक्त अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी यांच्या मागे आहे. अंबानींचा भारताच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्यापेक्षाही मोठा आहे, ज्यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, २०५० पर्यंत भारत ३० ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था होईल.
अमृतकाळात भारताला आर्थिक विकासात बदल दिसेल…
- भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गांधीनगर येथील पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या १०व्या दीक्षांत समारंभात सांगितले की, भारत २०४७ पर्यंत तीन ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेवरून ४० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत वाढेल.
- अमृत काळात देशाची आर्थिक वाढ आणि संधींमध्ये अभूतपूर्व बदल होणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
- स्वच्छ ऊर्जा, जैव-ऊर्जा आणि डिजिटल क्रांती या तीन महत्त्वाच्या (गेम चेंजिंग) क्रांती येत्या दशकांमध्ये भारताच्या आर्थिक विकासाचे नेतृत्व करतील, असे ते म्हणाले.
बायो एनर्जी क्रांतीमध्ये रिलायन्स ऊर्जा निर्मिती करेल!!
- तेलापासून दूरसंचारापर्यंत काम करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अंबानी म्हणाले की, स्वच्छ ऊर्जा आणि जैव-ऊर्जा क्रांतीमुळे शाश्वत ऊर्जा निर्माण होईल, तर डिजिटल क्रांतीमुळे आपल्याला ऊर्जा कार्यक्षमतेने वापरता येईल.
- ते म्हणाले की या तिन्ही क्रांती एकत्रितपणे भारत आणि जगाला हवामान संकटापासून वाचविण्यात मदत करतील.