मुक्तपीठ टीम
टाटा स्टीलच्या इक्विपमेंट मेंटेनन्स सर्व्हिसेस म्हणजेच ईएमएस विभागात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भारतातील पहिले मल्टिपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको इंजिन येथे यशस्वीरित्या सुरू केले गेले. इक्विपमेंट मेंटेनन्स सर्व्हिसेसने पहिले भारतीय मल्टीपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको तयार केले, जे भारतातील पहिले मल्टीपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको आहे. लोको इंजिन अपघात टाळण्यासाठी आणि मॅन-मशीन इंटरफेस कमी करण्यासाठी टाटा स्टीलमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
मल्टिपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको इंजिन कसे असणार?
- भारतीय मल्टिपल युनिट रिमोट ऑपरेटेड लोको इंजिन यशस्वीरित्या वापरले गेले.
- एकाच रिमोटवरून दोन लोको इंजिन चालवता येतात. अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे.
- यामध्ये दोन लोको इंजिन एकत्र करून हे तयार करण्यात आले, जे एकाच रिमोटवरून चालवले जातात.
लोको इंजिनचे यशस्वी संचालन!
- लोको इंजिनचे विविध विभागांच्या समन्वयाने यशस्वी संचालन करण्यात आली आहे.
- इक्विपमेंट्स मेंटेनन्स सर्व्हिसेस, एसएसटीजी, टाटा स्टील ऑटोमेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड यांनी त्याबद्दल बरेच शोध लावल्यानंतर संयुक्तपणे त्याचा वापर सुरू केला.
- टाटा स्टीलचे व्हीपी शेअर्ड सर्व्हिसेस प्रबल घोष, व्हीपी आयएम उत्तम सिंह आणि टाटा वर्कर्स युनियनचे सरचिटणीस सतीश सिंह, उपाध्यक्ष शैलेश कुमार सिंह आणि विभागीय प्रमुख सतीश गणपती यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
लोको इंजिनचे सर्व काम टीम वर्क अंतर्गत पूर्ण झाले आणि आता हे ऑटोमेशनच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामध्ये विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सर्व समिती सदस्य आर आर शरण, बीके राम, बिनोद ठाकूर, तारकेश्वर लाल, एचएन प्रसाद आणि जेडीसीचे अध्यक्ष राजकुमार उपस्थित होते.