Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोवर साथ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कस्तुरबा रुग्णालयात केली रुग्ण- नातेवाईकांची विचारपूस

November 18, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
मा मुख्यमंत्री कस्तुरबा हॉस्पिटल भेट 1

मुक्तपीठ टीम

मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग यांनी व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिकेने सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.            

मुंबई शहरातील गोवर प्रादुर्भावामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. याठिकाणी त्यांनी महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली.            

या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपचारांबाबत आणि अनुषंगिक बाबींची माहिती घेतली. नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.            

त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण न झाल्यामुळे बालकांमध्ये प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. याबाबत महापालिकेची आणि  सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेने तातडीची उपाययोजना म्हणून एका मोहिमेत सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केले आहे. लसीकरणापासून दूर राहिलेल्या बालकांना लस देण्याबाबत संबंधित सर्वच क्षेत्रात जाणीवजागृती करण्यात येत आहे. तेथील लोकप्रतिनिधींपासून महत्वाच्या आणि प्रमुख अशा व्यक्तींशी संपर्क साधण्यात येत आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे बालकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी म्हणून जीवनसत्त्वाच्या गोळ्या आणि आवश्यक अशा सर्व उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. बालकांना चांगले उपचार मिळावेत, यासाठीही निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व परिस्थितीवर आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी सतर्कपणे आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही दिल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले.            

यावेळी पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.


Tags: Cm Eknath ShindeMaharashtraMeaslmumbaiगोवर साथमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १४ महत्वाचे निर्णय

Next Post

अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी

Next Post
अतिवृष्टी

अतिवृष्टीमुळे बाधित औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!