Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपुरात हिजाब ठिक करताना मुलीनं सेफ्टी पिन गिळली, डॉक्टरांनी कशी काढली?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
hijab

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने तिचा हिजाब नीट करत असताना त्याची सेफ्टी पिन चुकून गिळली. या मुलीने दातांमध्ये ही सेफ्टी पिन पकडली होती. सहावीत शिकणारी ही मुलगी इतरांप्रमाणे हिजाब सेफ्टी पिनने लावत होती, मात्र दुर्दैवाने सेफ्टी पिन तिच्या विंडपाइपमध्ये अडकली असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या आई-वडिलांना ही घटना कळताच त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांना अथक प्रयत्नानंतर तिचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

सेफ्टी पिन गिळल्याचे कळताच, रूग्णालयात उपचारासाठी दाखल!

  • मुलगी तिच्या शाळेत असताना ही घटना घडली.
  • दुपारी मधल्या सुट्टीत मुलीने तिचा हिजाब ठिक करण्यासाठी पिन काढली.
  • घरातील वडिलधाऱ्यांच्या पद्धतीचं अनुकरण करत तिने ती पिन दातांनी धरली आणि मग चुकून ती पिन गिळली.
  • पिन गिळल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं.
  • घटनेची माहिती मिळताच तिच्या पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
  • रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

नॉन-इनवेसिव्ह ब्रॉन्कोस्कोपी शस्त्रक्रिया ठरली यशस्वी!

  • अल्पवयीन मुलीला नागपूरच्या आयजीजीएमसीएचच्या ईएनटी विभागात नेण्यात आले, जिथे क्ष-किरणाने मुलीच्या विंडपाइपमध्ये पिन अडकल्याचे उघड झाले.
  • त्यानंतर डॉक्टरांनी नॉन-इनवेसिव्ह ब्रॉन्कोस्कोपी केली आणि पिन काढली.
  • शस्त्रक्रियेनंतर पीडितेला २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आणि तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.

विशेष म्हणजे, पिन यशस्वीरित्या काढून टाकल्यानंतर, डॉक्टरांनी महिला आणि मुलींना सावध केले आहे की साडी किंवा हिजाब परिधान करताना पिन दात किंवा ओठांनी धरण्याची सवय घातक ठरू शकते. कृपया चुकूनही अशी चूक करू नका.


Tags: HijabMaharashtramuktpeethnagpurNon-Invasive Bronchoscopy SurgerySafety Pinघडलं-बिघडलंनागपूरनॉन-इनवेसिव्ह ब्रॉन्कोस्कोपी शस्त्रक्रियामहाराष्ट्रमुक्तपीठसेफ्टी पिनहिजाब
Previous Post

कुत्रा चावला? जाणून घ्या सर्वात आधी काय करायचं…

Next Post

सांगलीच्या नऊ वर्षांच्या चिमुरडीनं सर केला महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला

Next Post
Sangli

सांगलीच्या नऊ वर्षांच्या चिमुरडीनं सर केला महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!