मुक्तपीठ टीम
कुत्रा पाळीव असो किवा नसो त्यासोबत खेळत असताना तो कुत्रा तुमचा चावाही घेऊ शकतो किंवा अचानक गुरगुरणे आणि शेपूट हलवताना तीक्ष्ण दातांनी ओरबडू शकतो. कधी कधी तुम्ही रस्त्याने जात असता अचानक कुत्रा तुमच्या अंगावर हल्ला करतो, हल्ली पाळीव कुत्रा चावण्याच्या घटनेत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत जर कुत्रा चावला तर काय करावे, कधी इंजेक्शन घ्यावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती जाणून घेवूया…
कुत्रा चावल्यास घरगुती उपाय?
- चावलेली जागा डिटर्जंट साबणाने पूर्णपणे धुवा, स्वच्छ धुवा.
- जखम खूप खोल असेल तर प्रथम साबणाने धुवा आणि नंतर बीटाडीन औषध लावा.
- त्यामुळे रेबीज विषाणूचा प्रभाव कमी होतो.
- जखम पूर्णपणे धुणे आवश्यक आहे.
- जवळच्या डॉक्टरांकडे जावे.
कुत्रा चावला तर लगेच करा हे उपाय
- सौम्य साबण वापरून जखम प्रथम धुवा आणि त्यावर पाच ते १० मिनिटे कोमट पाणी टाका.
- स्वच्छ कापड्याने रक्तस्त्राव कमी करा.
- ओव्हर-द-काउंटर ही अँटीबायोटिक क्रीम लावा.
- जखमेला पट्टीने गुंडाळा.
- जखमेवर मलमपट्टी करा आणि डॉक्टरांकडे जा.
- जखमेची दिवसातून अनेक वेळा पट्टी बदला.
- लालसरपणा, सूज, वाढलेली वेदना आणि ताप यासह संसर्गाची चिन्हे पाहा.
अशा परिस्थितीत डॉक्टर काय करतात?
- डॉक्टर जखम पुन्हा स्वच्छ करतील, मलम लावतील आणि औषधे लिहून देतील.
- शेवटचे टिटीचे इंजेक्शन कधी घेतले होते याची डॉक्टर माहिती घेणार.
- जखम खूप खोल असेल तर डॉक्टर टाके मारेल, कारण जखम उघडी राहिल्यास संसर्गाचा धोका वाढतो.